कर्नाटक भाजपात खांदेपालट; BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 19:06 IST2023-11-10T19:05:54+5:302023-11-10T19:06:02+5:30

Karnataka Politics: भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी बीवाय विजयेंद्र यांची कर्नाटकचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

Karnataka Politics: BS Yeddyurappa's son BY Vijayendra appointed as president of karnataka | कर्नाटक भाजपात खांदेपालट; BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

कर्नाटक भाजपात खांदेपालट; BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

Karnataka BJP President BY Vijayendra: मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपला काँग्रसेने जोरदार धक्का दिला आणि राज्यात पुन्हा काँग्रेसचे शासन आले. त्या निवडणुकीच्या काही महिन्यांनंतर आता राज्यात मोठा खंदेपालट झाला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी शुक्रवारी (10 नोव्हेंबर) जारी केलेल्या निवेदनानुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांचे पुत्र आणि आमदार विजयेंद्र येडियुरप्पा (BY Vijayendra) यांची कर्नाटक भाजप (Karnataka BJP) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते आता विद्यमान अध्यक्ष नलील कुमार काटीलNalin Kumar Kateel ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Karnataka Politics: BS Yeddyurappa's son BY Vijayendra appointed as president of karnataka