धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:45 IST2025-07-01T17:44:35+5:302025-07-01T17:45:09+5:30
पोलिसांनी या घटनेचा तपाससुरू केला आहे.

धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
Karnataka News: कर्नाटकातीलबेळगाव जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाने ऑटोमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राघवेंद्र जाधव (२८) आणि रंजिता चोबारी (२६) अशी या दोघांची नावे असून, त्यांनी गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावात टोकाचे पाऊल उचलले. दोघेही जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यातील मुनावल्ली येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे अनेक वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. राघवेंद्र आणि रंजिता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु रंजिताच्या घरच्यांनी बळजबरीने तिचे १५ दिवसांपूर्वी दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले अन् साखरपुडाही उरकून घेतला. यामुळे रंजिता आणि राघवेंद्र खूप दुखी होते. एकमेकांपासून वेगळे राहावे लागेल, या विवंचनेतून दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
आज सकाळी दोघेही ऑटोमध्ये बसले आणि चिक्कनंदी गावाच्या बाहेरील एका निर्जन ठिकाणी गेले. नंतर दोघांनीही ऑटोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांनीही ऑटोच्या मागच्या सीटवर असलेल्या लोखंडी रॉडला दोरी बांधून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.