शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:04 IST

कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळुरू: कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत. गुरुवारी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिलेला नसल्याचे कारण असल्याचे सांगितले होते. मतदार याद्यांमधील विसंगती आणि मत चोरीच्या आरोपांचा उल्लेख करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी सुधारित आणि आवश्यक असल्यास, पुन्हा तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला अधिकार देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.

भाजपचे टीकास्त्रनिवडणुकीत मतपत्रिका वापरण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय हा सत्ताधारी पक्ष मत चोरी करून सत्तेत आला आहे, याचे स्व-प्रमाणीकरण आहे, अशी टीका भाजपने केली आहे. आमदारांना आणि खासदारांना राजीनामा देण्याचे आवाहन करताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र म्हणाले की, त्यांना मतपत्रिका वापरून पुन्हा निवडणूक जिंकू द्या, किंवा ते मचोरीद्वारे सत्तेत आले आहेत हे मान्य करा.

भाजपला काळजी का? - डी.के. शिवकुमारउपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना विचारले की, हा कर्नाटक सरकारचा निर्णय आहे, भाजपला काळजी का? सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ शकते. भाजपच्या कार्यकाळात बनवलेल्या कायद्यात एक तरतूद आहे. निवडणुकीत मतपत्रिका किंवा ईव्हीएम वापरले जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्याचा निर्णय घेतला आहे, तुम्ही का घाबरता? संसदीय निवडणुकांमध्ये काय घडले, याची आम्ही चौकशी केली आहे, मला आता त्यावर चर्चा करायची नाही.  

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक