Karnataka CM Race LIVE: येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे चार आमदार 'नॉट रिचेबल'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 08:27 AM2018-05-17T08:27:51+5:302018-05-17T10:12:25+5:30

15 दिवसांमध्ये भाजपाला बहुमत सिद्ध करावं लागणार

Karnataka election 2018 yeddyurappa to take oath as chief minister live updates | Karnataka CM Race LIVE: येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे चार आमदार 'नॉट रिचेबल'

Karnataka CM Race LIVE: येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे चार आमदार 'नॉट रिचेबल'

Next

नवी दिल्ली: त्रिशंकू विधानसभा, जेडीएस-काँग्रेसची निवडणुकीनंतरची युती, सत्ता स्थापनेचे दावे, त्यानंतर भाजपा विरुद्ध काँग्रेस-जेडीएस यांनी केलेले आरोप-प्रत्यारोप, राज्यपालांनी रात्री भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण आणि त्यानंतर पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी, अशा नाट्यपूर्ण घडामोडी कर्नाटकमध्ये घडत आहेत. सत्ता स्थापनेसाठी कर्नाटकात राजकीय नाटक सुरुच आहे. सध्या यात भाजपानं आघाडी असून पक्षाचे विधीमंडळ नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 75 वर्षांच्या येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ 105 वर पोहोचलं आहे. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. हा बहुमताचा आकडा भाजपा कसा गाठणार, यासाठीची जुळवाजुळव भाजपाकडून कशी केली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Live Updates:

- काँग्रेसचे चार आमदार बेपत्ता; चोवीस तासांपासून पक्षाच्या संपर्कात नाहीत



 



 



 



 



 



 



 



 



 

- सिद्धरामय्या राजभवानाकडे रवाना

- सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष



 



 



 



 



 



 



 

 

Web Title: Karnataka election 2018 yeddyurappa to take oath as chief minister live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.