शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Karnataka Assembly Elections: पाच वर्षांमध्ये कधी तीन तर कधी चार मुख्यमंत्री, कर्नाटक विधानसभेचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 5:58 PM

कर्नाटक विधानसभेचा इतिहास पाहाता सलग पाच वर्षे एकाच मुख्यमंत्र्याला कार्यकाळ पूर्ण करण्याची वेळ फारच कमी वेळा आल्याचे दिसून येते.

बंगळुरु- कर्नाटक विधानसभेचा इतिहास पाहाता सलग पाच वर्षे एकाच मुख्यमंत्र्याला कार्यकाळ पूर्ण करण्याची वेळ फारच कमी वेळा आल्याचे दिसून येते."विधानसौधा'"मध्ये एकेका वेळेस चारचार किंवा तीन मुख्यमंत्री पाहिल्याची अनेकदा वेळ आली आहे. पहिल्याच विधानसभेत के.सी. रेड्डी, केंगल हनुमंतय्या, कडिडल मंजाप्पा, एस. निजलिंगाप्पा असे चार मुख्यमंत्री होते. तर दुसऱ्या विधानसभेत एस. निजलिंगाप्पा, बी. डी. जत्ती अशी जोडी होती. तिसऱ्या विधानसभेत आधी एस. आर. कांती आणि नंतर पुन्हा निजलिंगाप्पा मुख्यमंत्री झाले. चौथ्या विधानसभेत निजलिंगाप्पा सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री झाले पण वीरेंद्र पाटील मुख्यमंत्री झाले. त्यानंतर देवराज अर्स पूर्ण पाचवर्षे मुख्यमंत्री झाले पण सहाव्या विधानसभेत त्यांच्या जागी आर. गुंडूराव आले. नंतर सातव्या विधानसभेत रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले मात्र ही विधानसभा दोन वर्षेच चालली. आठवी विधानसभा 1985 साली स्थापन झाली तिचा कार्यकाळ चार वर्षांचा होता त्यामध्ये हेगडेंबरोबर बोम्मईदेखील आले. नवव्या विधानसभेत वीरेंद्र पाटील, एस. बंगारप्पा आणि एम. विरप्पा मोईली हे तीन मुख्यमंत्री होतेय दहाव्या विधानसभेत एच. डी. देवेगौडा आणि जे. एम. पटेल हे मुख्यमंत्री होते.अकराव्या विधानसभेत 1999 साली एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री झाले. त्यांनी 2004 पर्यंत सरकार चालवले. 2004 साली निवडणुका झाल्यावर त्रिशंकू विधानसभेत धरमसिंह पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यानंतर एच. डी. कुमारस्वामी आणि नंतर येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले. अशा प्रकारे या विधानसभेत तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री पदावरती आले. त्यानंतर 2008 साली भाजपाचे दक्षिण भारतातील पहिले स्वबळावरील सरकार कर्नाटकात स्थापन झाले पण 110 जागा मिळूनही भाजपाला एकच मुख्यमंत्री पाच वर्षे कायम ठेवता आला नाही. येडीयुरप्पा, बी. एस. सदानंद गौडा आणि जगदिश शेट्टर असे तीन मुख्यमंत्री भाजपाने दिले. त्यानंतर 2013 साली काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन सिद्धरामय्या यांनी पाच वर्षे सलग सरकार सांभाळले.

विधानसभा                  कार्यकाळ                मुख्यमंत्रीपहिली विधानसभा-      1952-1957           के. सी रेड्डी, केंगल हनुमंतय्या, कडिडल मंजाप्पा, एस. निजलिंगाप्पादुसरी विधानसभा-        1957-1962         एस. निजलिंगाप्पा, बी.डी. जत्तीतिसरी विधानसभा-      1962-1967         एस. आर. कांती, एस. निजलिंगाप्पाचौथा विधानसभा-        1967-1971          एस. निजलिंगाप्पा, वीरेंद्र पाटीलपाचवी विधानसभा-     1972-1977          डी. देवराज अर्ससहावी विधानसभा-     1978-1983         डी. देवराज अर्स, आर. गुंडू रावसातवी विधानसभा-     1983-1985        रामकृष्ण हेगडेआठवी विधानसभा-     1985-1989        रामकृष्ण हेगडे, एस. आर बोम्मईनववी विधानसभा-     1989-1994         वीरेंद्र पाटील. एस. बंगारप्पा, एम.विरप्पा मोईलीदहावी विधानसभा-     1994-1999        एच. डी. देवेगौडा, जे. एम. पटेलअकरावी विधानसभा-  1999-2004       एस. एम. कृष्णाबारावी विधानसभा-     2004-2007       धरमसिंह, एच.डी. कुमारस्वामी, बी.एस. येडीयुरप्पातेरावी विधानसभा-      2008-2013       बी.एस. येडीयुरप्पा, डी.व्ही सदानंद गौडा, जगदीश शेट्टरचौदावी विधानसभा-     2013-2018       सिद्धरामय्या

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)Chief Ministerमुख्यमंत्रीIndiaभारतElectionनिवडणूक