Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:31 IST2025-12-04T11:25:02+5:302025-12-04T11:31:23+5:30
Sunny Leone : शेताजवळ बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे मोठे पोस्टर लावत आहेत.

फोटो - आजतक
आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. ते त्यांच्या शेताजवळ बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे मोठे पोस्टर लावत आहेत. यामुळे लोकांचं लक्ष पिकांऐवजी पोस्टरकडे वेधलं जाईल आणि शेतकऱ्यांना कष्टाचं रक्षण होईल असं वाटत आहे.
आंध्र प्रदेशातील बांदा किंडी पल्ली गावातील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने त्याच्या शेतात फ्लॉवर आणि आणि कोबी लावले आहेत. याच दरम्यान त्याने सनी लिओनीचं एक मोठं पोस्टर देखील लावलं आहे. त्याने स्पष्ट केलं की या वर्षी चांगलं पीक आलं आहे. गावकरी किंवा ये-जा करणाऱ्यांनी त्यावर वाईट नजर टाकू नये असं वाटत नाही. म्हणून शेतकऱ्याने ही अनोखी पद्धत अवलंबली.
कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील मुदानूर गावातील हुनासगी तालुक्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या कापसाच्या पिकाजवळ लाल ड्रेसमध्ये असलेल्या सनी लिओनीचं मोठं पोस्टर लावलं आहे. शेतकरी म्हणतो की, या वर्षीचे उत्पादन खूप चांगलं आलं आहे आणि त्याला कोणाचीही नजर लागू नये. पोस्टर्स पाहून लोकांचं लक्ष त्यांच्या पिकांपासून विचलित होतं असं त्याचं मत आहे.
शेतकरी पूर्वी आपल्या शेतात पिकांचं रक्षण करण्यासाठी बुजगावणं किंवा काळं कापड लावत असत. त्यांचा असा विश्वास होता की, यामुळे वाईट नजरेपासून बचाव होईल. परंतु आता, बरेच शेतकरी आधुनिक पद्धती वापरत आहेत, यामध्ये आता सनी लिओनीचे पोस्टर्स सर्वात लोकप्रिय होत आहेत. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.