कर्नाटकमध्ये बस कालव्यात कोसळली, 25 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 15:06 IST2018-11-24T14:36:29+5:302018-11-24T15:06:07+5:30

कर्नाटकातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 25 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Karnataka: 25 people died after the bus they were in, fell into VC canal near Mandya | कर्नाटकमध्ये बस कालव्यात कोसळली, 25 जणांचा मृत्यू

कर्नाटकमध्ये बस कालव्यात कोसळली, 25 जणांचा मृत्यू

ठळक मुद्देकर्नाटकातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळल्याची घटना घडली आहे. भीषण अपघातात 25 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे.

बंगळुरू - कर्नाटकातील मांड्या येथे एक खासगी बस कालव्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 25 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मांड्या जिल्ह्यातील कावेरी नदीला जोडणाऱ्या कालव्यात शनिवारी (24 नोव्हेंबर) एक खासगी बस कोसळली. या भीषण अपघातात 25हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 




 

Web Title: Karnataka: 25 people died after the bus they were in, fell into VC canal near Mandya