Video - "मी तुला पोलीस ठाण्यात राहू देणार नाही..."; संतापलेल्या भाजपा आमदाराची थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 18:20 IST2026-02-26T18:20:08+5:302026-02-26T18:20:59+5:30

भाजपा आमदार कैलाश राजपूत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

kannauj bjp mla kailash rajput phone warning so viral video | Video - "मी तुला पोलीस ठाण्यात राहू देणार नाही..."; संतापलेल्या भाजपा आमदाराची थेट धमकी

Video - "मी तुला पोलीस ठाण्यात राहू देणार नाही..."; संतापलेल्या भाजपा आमदाराची थेट धमकी

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तिरवा विधानसभा क्षेत्रातील इंदरगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंदौआ गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक भाजपा आमदार कैलाश राजपूत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, चंदौआ गावचे रहिवासी असलेले अखिलेश राजपूत आपल्या कुटुंबातील एका लग्नकार्यासाठी गावात आले होते. याच दरम्यान उच्च दाबाची वीजवाहिनी तुटून गावातील वीजवाहिनीवर पडली. यामुळे अचानक उच्च दाबाचा विद्युत प्रवाह निर्माण झाला. त्याच वेळी अखिलेश एका खांबाजवळून जात असताना त्यांना जोराचा करंट लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी वीज विभागाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला. कुटुंबातील सदस्यांनी इंदरगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र पोलीस स्टेशन प्रमुखांनी तक्रार अर्जातील मजकुरात परस्पर बदल केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

तिरवा मतदारसंघाचे भाजपा आमदार कैलाश राजपूत मृताच्या घरी पोहोचले. तिथे कुटुंबीयांनी त्यांना पूर्ण घटनेची माहिती दिली आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर आमदारांनी फोनवरून संबंधित पोलीस स्टेशन प्रमुखांना (SO) खडसावलं. व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार म्हणत आहेत की, "मी तुला पोलीस ठाण्यात राहू देणार नाही. एकतर स्वतःमध्ये सुधारणा करून घे, नाहीतर आपले कपडे बॅगेतमध्ये भरून ठेव."

व्हिडिओमध्ये आमदार पुढे म्हणतात की, "एफआयआर (FIR) अशी दाखल कर, ज्यामुळे पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळू शकेल. तू काय वीज विभागाचा अधिकारी आहेस का?" असा सवालही त्यांनी विचारला. संवादादरम्यान आमदारांचा संताप स्पष्टपणे दिसून येत होता. आमदारांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात याचीच चर्चा रंगली आहे. 

एकीकडे पीडित कुटुंब न्याय आणि मदतीची मागणी करत आहे, तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगत आहेत. तसेच वीज विभागाच्या हलगर्जीपणाबाबतही चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title : विद्युत दुर्घटना में लापरवाही पर भाजपा विधायक ने पुलिस को धमकाया

Web Summary : कन्नौज में एक युवक की विद्युत दुर्घटना में मृत्यु के बाद, एक भाजपा विधायक ने कथित तौर पर प्राथमिकी बदलने और लापरवाह विद्युत विभाग का पक्ष लेने के लिए पुलिस को धमकाया। विधायक ने पीड़ित परिवार के लिए उचित जांच और मुआवजे की मांग की, जिससे विवाद उत्पन्न हो गया।

Web Title : BJP MLA Threatens Police Over Negligence in Electrocution Death Case

Web Summary : Following a youth's electrocution death in Kannauj, a BJP MLA threatened the police for allegedly altering the FIR and siding with the negligent electricity department. The MLA demanded proper investigation and compensation for the victim's family, sparking controversy.