VIDEO: ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाला अपघात, अभिवादन करत असताना सनरूफवर आदळले, छातीत दुखू लागले, प्रकृतीबाबत येतेय अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:48 IST2026-01-06T13:46:40+5:302026-01-06T13:48:05+5:30

Mahanaryaman Scindia Accident Video: भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे सुपुत्र माहानार्यमन शिंदे यांना आज शिवपुरी येथील दौऱ्यादरम्यान अपघात झाला. कोलारस विधानसभा मतदारसंघातील समर्थकांना अभिवादन करत असताना कार ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने सनरूफवर आदळून माहानार्यमन यांना दुखापत झाली.

Jyotiraditya Scindia's son met with an accident, hit the sunroof while greeting, started having chest pain, information is coming about his health | VIDEO: ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाला अपघात, अभिवादन करत असताना सनरूफवर आदळले, छातीत दुखू लागले, प्रकृतीबाबत येतेय अशी माहिती

VIDEO: ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाला अपघात, अभिवादन करत असताना सनरूफवर आदळले, छातीत दुखू लागले, प्रकृतीबाबत येतेय अशी माहिती

Mahanaryaman Scindia Accident: भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे सुपुत्र माहानार्यमन शिंदे यांना आज शिवपुरी येथील दौऱ्यादरम्यान अपघात झाला. कोलारस विधानसभा मतदारसंघातील समर्थकांना अभिवादन करत असताना कार ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने सनरूफवर आदळून माहानार्यमन यांना दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले महानार्यमन शिंदे हे शिवपुरीमधील कोलारस येथे आयोजित एक युवा संमेलन आणि कॉलेज ग्राऊंडर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी महानार्यमन हे कारच्या सनरूफमधून बाहेर येऊन समर्थकांना हात उंचावून अभिवादन करत होते.

त्याचदरम्यान, समोर गर्दी झाल्याने किंवा अचानक कुणीतरी पुढे आल्याने ड्रायव्हरने ब्रेक लावला. हा धक्का एवढा जोरात लागला की, महानार्यमन सनरूफच्या पुढच्या भागावर जाऊन आदळले. सुरुवातीला त्यांना काही त्रास जाणवला नाही. मात्र नंतर छातीत दुखू लागल्याने त्यांना तपासणीसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणी केल्यानंतर काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला.  

Web Title : ज्योतिरादित्य सिंधिया के बेटे रैली में कार दुर्घटना में घायल

Web Summary : ज्योतिरादित्य सिंधिया के बेटे महानार्यमन सिंधिया शिवपुरी में एक रैली के दौरान मामूली रूप से घायल हो गए। कार की सनरूफ से समर्थकों का अभिवादन करते समय, अचानक ब्रेक लगने से उनकी छाती में चोट लग गई। जांच के बाद उन्हें अस्पताल से छुट्टी दे दी गई।

Web Title : Jyotiraditya Scindia's Son Injured in Car Accident During Rally

Web Summary : Mahanaryaman Scindia, son of Jyotiraditya Scindia, sustained minor injuries during a rally in Shivpuri. While greeting supporters from a car sunroof, a sudden brake caused him to hit his chest. He was briefly hospitalized and discharged after examination.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.