जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:59 IST2025-05-19T13:52:30+5:302025-05-19T13:59:40+5:30
लष्कर-ए-तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र मुरीदके, जे भारताने उद्ध्वस्त केलं, तिथेच ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर येत आहे.

जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
पहालगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करून चोख उत्तर दिलं. या दरम्यान भारत आणि पाकिस्तानात संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर आता पुन्हा देशात मोठी खळबळ उडाली आहे. भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पोहोचवणाऱ्या ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली. तिच्याबद्दल आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. लष्कर-ए-तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र मुरीदके, जे भारताने उद्ध्वस्त केलं, तिथेच ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षणानंतर, तिला येथून पुढील मोहिमेसाठी भारतात पाठवण्यात आले. पण मिशन सुरू करण्यापूर्वीच तिला हरियाणा पोलिसांनी पकडले. पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती. या काळात तिने मुरीदकेमध्येच १४ दिवस घालवले.
हरियाणातील हिसार पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खुलासा ज्योतीने स्वतः चौकशीदरम्यान केला. मात्र, या चौकशीतून अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, ती मुरीदकेहून कोणत्या मोहिमेवर भारतात परतली होती. या मोहिमेत त्याच्याशिवाय आणखी किती लोक आहेत? या संदर्भात हिसार पोलीस तिची चौकशी करत आहेत. सध्या ज्योती मल्होत्रा पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांचा दावा आहे की, या मोहिमेत ज्योती एकटीच सहभागी नाही, तर २० हून अधिक लोक यात सहभागी आहेत. हे सर्व २० लोक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तान मुक्त संचार करत होती!
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानात जाण्यासाठी कोणतेही प्रतिबंधित क्षेत्र नव्हते. ती पाकिस्तानात जिथे वाटेल तिथे मुक्तपणे प्रवास करत असे. पाकिस्तान पोलिसांनी स्वतः तिच्या सुरक्षेची व्यवस्था केली होती. तिने अशा अनेक ठिकाणी भेट दिली, जिथे सामान्य भारतीयांना जाण्यास मनाई आहे. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरचे काही भाग, इस्लामाबाद, कराची आणि मुरीदके येथील काही ठिकाणांचा समावेश आहे. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या सूचनेवरून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी शाकीर याने त्याला ही सुविधा पुरवली होती.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय
पहलगाम हल्ल्यातही ज्योतीचा हात असू शकतो, अशी शक्यता हिसार पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, चौकशीदरम्यान तिने हे नाकारले आहे. ज्योती मल्होत्रा पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी काश्मीरमध्ये होती. या काळात, ती पहलगाममधील त्या ठिकाणीही गेली, जिथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही ज्योती पाकिस्तान दूतावासातील अधिकारी दानिशच्या संपर्कात होती.