Jyoti Malhotra : पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:43 IST2025-05-26T16:34:51+5:302025-05-26T16:43:00+5:30

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jyoti Malhotra video in scottish youtuber callum abroad pakistani spy for india | Jyoti Malhotra : पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य

Jyoti Malhotra : पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्कॉटलंडचा कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबरचा पाकिस्तानमधील एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ज्योती दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ज्योतीच्या मागे काही तरुण AK-47 घेऊन उभे असल्याचं दिसून येतं.

ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तान कनेक्शनवर या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा व्हिडीओ स्कॉटलंडचा युट्यूबर कॅलमचा आहे, ज्यामध्ये ज्योती पाकिस्तानच्या न्यू अनारकली मार्केटमध्ये व्लॉगिंग करताना दिसत आहे. यावेळी ज्योती आणि कॅलमची भेट होते. ते एकमेकांशी संवाद साधतात. मी भारतातून आल्याचं ज्योती त्याला सांगते. 

ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये ज्योती फिरत असताना तिच्यासोबत सहा ते सात लोक दिसतात, जे पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी असल्याचं सांगितलं जातं. या लोकांच्या हातात AK-47 सारखी शस्त्र आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हे सर्व जण ज्योतीला व्हीआयपी सारखी सुरक्षा प्रदान करत आहेत. त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटवर No Fear असं लिहिलेलं आहे.

"पप्पा, टेन्शन घेऊ नका, वकील पाहू नका, मी लवकर बाहेर येईन"; ज्योती मल्होत्राची वडिलांशी भेट

व्हिडिओमध्ये युट्यूबर कॅलमने आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हटलं की, एका सामान्य युट्यूबरसाठी इतकी कडक सुरक्षा पाहून त्याला धक्का बसला. ज्योती मल्होत्राला एका आठवड्यानंतर तिचे वडील हरीश मल्होत्रा ​​यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. ही भेट अवघ्या काही मिनिटांची होती. चौकशीदरम्यान झालेल्या या भेटीत ज्योतीने तिच्या वडिलांना धीर दिला. "पप्पा, टेन्शन घेऊ नका. माझ्यासाठी वकील पाहण्याची गरज नाही. न्यायाधीशांनी माझ्यासाठी वकीलाची व्यवस्था केली आहे. मी लवकरच बाहेर येईन" असं म्हटलं आहे. ज्योतीचे हे शब्द ऐकून तिचे वडील भावुक झाले.
 

Web Title: Jyoti Malhotra video in scottish youtuber callum abroad pakistani spy for india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.