Breaking: धक्कादायक! पूंछमध्ये लष्करी वाहनाला भीषण आग; चार जवानांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:38 IST2023-04-20T16:31:21+5:302023-04-20T16:38:41+5:30
ही आग अचानक लागली की दहशतवादी हल्ला झाला हे अद्याप समजू शकले नाही.

Breaking: धक्कादायक! पूंछमध्ये लष्करी वाहनाला भीषण आग; चार जवानांचा होरपळून मृत्यू
जम्मू काश्मीरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या वाहनाला अचानक आग लागल्याने त्यातील चार जवानांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओ आगीची दाहकता दाखवत आहे.
लष्करी वाहनाला लागलेल्या आगीत चार जवान शहीद झाल्याचे सांगितले जात आहे. ही आग अचानक लागली की दहशतवादी हल्ला झाला हे अद्याप समजू शकले नाही. अद्याप सैन्यदलाकडून कोणतेही अधिकृत कारण आलेले नाहीय.
Casualties feared as an Indian Army truck catches fire in Poonch district of Jammu & Kashmir
— ANI (@ANI) April 20, 2023
Details awaited. pic.twitter.com/QgVwYQIZQ4
हा अपघात भातादुडियान परिसरात पूंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर घडला. माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पाऊस पडत होता. यामुळे वीज पडल्याने ही आग लागली असावी असाही अंदाज तिथे उपस्थितांकडून लावला जात आहे.