रेल्वे ट्रॅक ओलांडताना वंदे भारतची धडक; पती-पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:19 IST2026-02-25T13:13:21+5:302026-02-25T13:19:40+5:30

Jharkhand News: रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीसह एका चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jharkhand: Family of Three Killed After Being Hit by Vande Bharat Express near Pakur | रेल्वे ट्रॅक ओलांडताना वंदे भारतची धडक; पती-पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

रेल्वे ट्रॅक ओलांडताना वंदे भारतची धडक; पती-पत्नीसह चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

झारखंडमधील म-रामपूरहाट रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. नवीनगर स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेसने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या लहान मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशीरा न्यू जलपाईगुडी-हावडा वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक २२३०२) आपल्या नियोजित मार्गावरून वेगाने जात होती. नागरनबी स्थानकाजवळ चंदन सरकार (वय, ३५), त्याची पत्नी रिम्पा (वय, २५) आणि आपल्या मुलीसह रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. रात्रीचा अंधार आणि वंदे भारत एक्सप्रेसचा प्रचंड वेग यामुळे या कुटुंबाला परिस्थितीचा अंदाज आला नाही. ट्रेनने जोरदार धडक दिल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता, हे कुटुंब राजा पाडा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत बोलताना जीआरपीचे उपनिरीक्षक रमेश किस्कू यांनी सांगितले की, "आम्ही तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे."

Web Title : रेलवे ट्रैक पार करते समय वंदे भारत की टक्कर, तीन की मौत

Web Summary : झारखंड में रेलवे ट्रैक पार करते समय वंदे भारत एक्सप्रेस की चपेट में आने से एक बच्चे सहित तीन लोगों की मौके पर ही मौत हो गई। यह दुखद घटना नागर नबीनगर स्टेशन के पास हुई, जिससे समुदाय में शोक की लहर है। रेलवे पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Vande Bharat Hits Family Crossing Tracks: Three Dead Instantly

Web Summary : A family of three, including a child, died instantly after being hit by the Vande Bharat Express while crossing railway tracks in Jharkhand. The tragic incident occurred near Nagar Nabinagar station, leaving the community in mourning. Railway police are investigating the accident.