Jharkhand Crime News: झारखंड राज्यातील गुमला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छीछवानी गावात १० वर्षीय मुलीसमोर तिच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे. माहिती मिळता, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
आरोपी फरार
मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र मिंज आहे. या हत्येप्रकरणी कामिल टोप्पो हा आरोपी असून, तो घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी छापेमारी मोहीम सुरू केली असून, लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.
प्रेमसंबंधातून हत्या
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, राजेंद्र मिंज आणि कामिल टोप्पो या दोघांचेही एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. अनेकदा त्या महिलेवरून दोघांमध्ये भांडणे होत होती आणि एकमेकांना धमक्याही दिल्या होत्या.
मुलीसमोरच हत्या
घटनेच्या दिवशी(सोमवारी) संध्याकाळी राजेंद्र मिंज आपल्या मुलीसोबत शेतात टोमॅटो आणण्यासाठी गेला होता. त्याच वेळी आधीपासून दबा धरून बसलेल्या आरोपी कामिल टोप्पोने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने लाठ्या-काठ्याने राजेंद्रला जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना त्याच्या मुलीसमोर घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
Web Summary : In Jharkhand, a man was brutally murdered in front of his 10-year-old daughter due to a love affair. The accused is absconding, and police are searching for him. The victim and the accused were both involved with the same woman, leading to frequent disputes.
Web Summary : झारखंड में प्रेम प्रसंग के चलते एक व्यक्ति की उसकी 10 वर्षीय बेटी के सामने बेरहमी से हत्या कर दी गई। आरोपी फरार है, और पुलिस उसकी तलाश कर रही है। पीड़ित और आरोपी दोनों एक ही महिला के साथ शामिल थे, जिसके कारण अक्सर विवाद होते थे।