झारखंडमध्येही घड्याळाची टिकटिक; राष्ट्रवादीची एका जागेवर आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 13:39 IST2019-12-23T13:38:58+5:302019-12-23T13:39:08+5:30
झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे.

झारखंडमध्येही घड्याळाची टिकटिक; राष्ट्रवादीची एका जागेवर आघाडी
रांची: झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, राजदमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. सध्या काँग्रेस आघाडी 36 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ३० जागांवर पुढे आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देखील एका जागेवर मुसंडी घेत आघाडी घेतली आहे.
झारखंडमधील हुसैनाबाद मतदारसंघात चौरंगी लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे झारखंडमध्ये राष्ट्रवादी खाते उघडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागा आहेत. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी राज्यात भाजपाला धक्का बसणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे झारखंडमध्ये नेमकं काय घडणार याबद्दल उत्सुकता आहे.