बस उलटून 5 जणांचा मृत्यू, 30 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 14:59 IST2019-02-03T14:53:37+5:302019-02-03T14:59:31+5:30

झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील कछुआबंध गावाजवळ प्रवासी बस उलटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.

Jharkhand : 5 killed, 7 critically injured in road accident | बस उलटून 5 जणांचा मृत्यू, 30 जखमी

बस उलटून 5 जणांचा मृत्यू, 30 जखमी

ठळक मुद्देबस उलटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

देवघर(झारखंड) - झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील कछुआबंध गावाजवळ प्रवासी बस उलटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. 
पोलीस अधिकारी ए. उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हे सर्वजण शेजारील दुमका जिल्ह्यात एका राजकीय सभेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. सभेनंतर बाघमारा गावात परत असताना ही भीषण दुर्घटना घडली. 

एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, जखमींना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर काहींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  
दुसरीकडे, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबायींना प्रशासनाकडून 50,000 रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. 
 

Web Title: Jharkhand : 5 killed, 7 critically injured in road accident