कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार 4 लाख रुपयांची मदत, बिहार सरकारचा मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 03:12 PM2020-09-07T15:12:32+5:302020-09-07T15:20:03+5:30

nischay sankalp rally 

jdu digital rally bihar cm nitish kumar says In case of death due to corona, the family will get assistance of Rs 4 lakh | कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार 4 लाख रुपयांची मदत, बिहार सरकारचा मोठा निर्णय 

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार 4 लाख रुपयांची मदत, बिहार सरकारचा मोठा निर्णय 

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदतकोरोनासंदर्भात सरकारने अनेक मोठी पावले उचलली - नितीश कुमारकोरोना काळात 15 लाखहून अधिक लोक राज्यात परतले.

पाटणा -बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक जसजशी जवळ येऊ लगली आहे. तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. विरोधक एकमेकांवर निशाना साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आज राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पहिल्या डिजिटल रॅलीतून (निश्चय संकल्प रॅली) बिहारच्या जनतेशी संवाद साधत, विरोधकांवरही हल्ला चढवला. यावेळी नितीश यांनी कोरोना टेस्टपासून ते वीजेच्या प्रश्नापर्यंत आपल्या सरकारने केलेल्या अनेक कामांचा पाढा वाचला. 

बिहारमध्ये आता घरा-घरात वीज पोहोचली आहे. यामुळे कंदील वपरण्याचे दिवस आता संपले आहेत. आज राज्यात रोजच्या रोज दीड लाखहून अधिक लोकांची कोरोना तपासणी होत आहे. एवढेच नाही, तर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधिति व्यक्तीच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णयही सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. 

कोरोनासंदर्भात सरकारने अनेक मोठी पावले उचलली - 
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, आपण कोरोनाला आळा घालण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासूनच सुरूवात केली. लॉकडाउन काळात आपण लोकांना जागरूक केले. यानंतर अनलॉकलादेखील सुरूवात झाली आहे. लोकांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. बिहारमध्ये आता रोजच्या रोज 1 लाख 50 हजारहून अधिक कोरोना टेस्ट होत आहेत. सर्वाधिक तपासण्या  अँटीजन टेस्टच्या सहाय्याने होत आहेत. एवढेच नाही, तर लवकरात लवकर कोरोनाची तपासणी व्हावी यासाठी आता सरकार 10 आरटीपीसीआर मशीनदेखील विकत घेत असल्याचे नितीश यांनी सांगितले. 

'कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत -
"बिहार सरकारने कोरोना महामारीसंदर्भात अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याकाळात 15 लाखहून अधिक लोक राज्यात परतले आहेत. त्यांना 14 दिवसांपर्यंत क्वारंटाइन करण्यात आले होते. याकाळात प्रत्येक व्यक्तीवर जवळपास 5,300 रुपये खर्च करण्यात आला. तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि आम्ही रेशनच्या बाबतीतही लोकांना मदत केली. आम्ही लोकांची सेवा करतो प्रचार करत नाही," असेही मुख्यमंत्री नितीश म्हणाले.

'बिहारमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक - 
बिहारमध्ये कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक, म्हणजेच 88.24 टक्के एवढी आहे. कोरनावरील उपचारांसाठी आता त्रिस्तरीय व्यवस्था करण्यात आली आहे. होम आयसोलेशन शिवाय कोविड केअर सेंटर्स, कोविड हेल्थ सेंटर्स आणि कोविड रुग्णालयांत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अवलंबून असलेल्याला नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचा विमाही देण्यात आला आहे, असेही नितीश यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine : खूशखबर! स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

Web Title: jdu digital rally bihar cm nitish kumar says In case of death due to corona, the family will get assistance of Rs 4 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.