VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:59 IST2025-06-29T17:58:56+5:302025-06-29T17:59:57+5:30
शाळेत पाणी शिरले तेव्हा सर्व मुले गाढ झोपेत होते; सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
Jamshedpur Rain Mudra River : देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे मोठी वित्त आणि जीवितहानीचे वृत्तही समोर येत आहे. अशातच, मध्य प्रदेशातील गुद्रा नदीची पाणी पातळी अचानक वाढल्यामुळे जमशेदपूरमधील पोटका येथील लव कुश निवासी शाळेत पाणी साचले. यामुळे शाळेत राहणारी १६२ मुले या पुराच्या पाण्यात अडकली. विद्यार्थ्यांना रात्रभर शाळेच्या छतावर आश्रय घ्यावा लागला.
जमशेदपुर: गुड़रा नदी उफान पर, लव कुश विद्यालय जलमग्न, 162 बच्चे फंसा, बड़ी मुश्किल से बचाया गया pic.twitter.com/lSi3bjIR9v
— Dharmendra Singh (@dharmendra135) June 29, 2025
सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. नदीजवळील लव कुश निवासी शाळेत पाणी शिरले, त्यावेळी सर्व मुले शाळेच्या वसतिगृहात झोपली होती. माहिती मिळताच प्रशासन सक्रिय झाले आणि तातडीने बचाव कार्य राबवले. जमशेदपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बोटी आणि इतर साधनांची मदत घेण्यात आली. पोलिस दलाने सर्व १६२ मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले. बचाव कार्यादरम्यान, मुलांना प्रथमोपचार आणि अन्न देखील देण्यात आले.
PHOTO | Jamshedpur, Jharkhand: 162 students were rescued earlier today who were trapped in inundated residential school after heavy rain in the region.
— Press Trust of India (@PTI_News) June 29, 2025
(Source: Third Party) pic.twitter.com/leZtGjIq4l
वाढत्या पाण्यामुळे गोंधळ उडाला
पाण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने तिथे झोपलेल्या १६२ मुलांमध्ये गोंधळ उडाला. मुले कसेबसे शाळेच्या छताकडे धावली. पाण्याची पातळी इतकी वाढली होती की, शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेली. सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने छतावर अडकलेल्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.