शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मेहबूबा मुफ्तींच्या पक्षात फूट?, PDPचे आमदार भाजपासोबत हातमिळवणीस तयार - पीडीपी आमदार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 08:41 IST

मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य सध्या संकटात असल्याचं दिसत आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यापासून पक्षाच्या अनेक आमदारांनी उघडपणे पक्षविरोधी सूर लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

श्रीनगर : जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा  बाहेर पडल्यामुळे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य सध्या संकटात असल्याचं दिसत आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यापासून पक्षाच्या अनेक आमदार उघडपणे पक्षविरोधी सूर लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

(पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर; 14 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत)

या पार्श्वभूमीवर पीडीपीचे आमदार भाजपासोबत हातमिळवणी करुन राज्यात नवीन सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पीडीपी आमदार अब्दुल माजिद पद्दार यांनी भाजपासोबत जाण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेनं आणखी जोर धरला आहे. पद्दार शनिवारी म्हणाले की, पीडीपीचे आमदार भाजपाच्या मदतीनं राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा विचार करत आहेत. आमचे 28 पैकी 18 आमदार भाजपासोबत हात मिळवण्यास तयार आहेत. शिवाय, नवीन सरकार स्थापनेसाठी भाजपासोबत बोलणी सुरू असल्याचेही संकेत यावेळी त्यांनी दिलेत. पद्दार असंही म्हणाले की, ''जेव्हा माझे नेता स्वर्गीय मुफ्ती मोहम्मद सईद भाजपासोबत युती करू शकत होते, तर मग आम्ही भाजपासोबत सरकार स्थापन का करू शकत नाही?''.

(BJP-PDP Alliance: पीडीपी फोडायचा प्रयत्न केलात, तर सलाऊद्दीन जन्माला येईल; मेहबूबा मुफ्तींचा भाजपाला इशारा)

मेहबूबा मुफ्ती यांनी पक्षात फुट पाडण्यावरुन भाजपाला इशारा दिला त्यावेळेस पद्दार यांनी हे विधान केले आहे. पीडीपी फोडण्याचा प्रयत्न कराल, तर परिणाम गंभीर होतील, असा इशारा काही दिवसांपूर्वी मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपाला दिला होता. 'जर दिल्लीतील सरकारनं 1987 प्रमाणे लोकांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल,' असं मुफ्ती म्हणाल्या. 'त्यावेळी एक सलाऊद्दीन आणि यासिन मलिक जन्माला आले होते. यावेळी परिस्थिती आणखी चिघळेल,' असंही त्यांनी म्हटले होते.

तर दुसरीकडे, पीडीपीचे 14 आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं नाराज नेते आबिद अन्सारी यांनीही म्हटले होते. तसंच मुफ्ती यांच्याकडून घराणेशाहीला प्रोत्साहन दिलं जात असल्याची उघड टीका बारामुल्लाचे आमदार जावेद हुसेन यांनी केली होती. गुलमर्गचे आमदार मोहम्मद वाणी यांनीही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्यावरुन पक्ष सोडण्याची घोषणा केली होती.  पीडीपीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला असून पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Mehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदी