पुंछच्या जंगलात 14व्या दिवशीही चकमक सुरुच, 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:12 PM2021-10-24T12:12:33+5:302021-10-24T12:12:38+5:30

Jammu-Kashmir: चकमकीत दहशतवादी झिया मुस्तफाही जखमी झाल्याची माहिती आहे.

Jammu Kashmir News, encounter continued on the 14th day in Poonch forest, 3 jawans were injured and one civilian was killed | पुंछच्या जंगलात 14व्या दिवशीही चकमक सुरुच, 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू

पुंछच्या जंगलात 14व्या दिवशीही चकमक सुरुच, 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू

Next

श्रीनगर: मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. या दरम्यान सुरक्षा दलाची अनेकदा दहशतवाद्यांशी चकमक झाल्या आहेत. आजही झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, क्रॉस फायरिंगमध्ये एक काश्मीरी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तर, चकमकीत एक दहशतवादीही जखमी झाल्याची माहिती आहे. 

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये झाली. तुरुंगातील पाकिस्तानी दहशतवादी झिया मुस्तफाला दहशतवाद्यांचा अड्डा ओळखण्यासाठी भटादुरियन येथे नेण्यात आले होते, तेव्हा इतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलानेही फायरिंग सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्कराचा एक जवान आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

या चकमकीत दहशतवादी झिया मुस्तफाही जखमी झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या जखमी जवानांवर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या कारवाईनंतर सुरक्षा दलाने तपास अभियान वाढवले असून, संपूर्ण परिसराचा घेराव घातला आहे. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जंगलाचा मोठा भाग तपासण्यात आला आहे. आता उर्वरित भागही तपासला जात आहे.
 

Web Title: Jammu Kashmir News, encounter continued on the 14th day in Poonch forest, 3 jawans were injured and one civilian was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.