शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जम्मूतील नागरिकही शत्रूविरोधात सज्ज!

By admin | Updated: October 13, 2016 06:21 IST

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील काही गावे कायम दहशतवादाच्या छायेत राहणारी आहेत. या गावांतील प्रत्येक नागरिकाला चोवीस तास संरक्षण

संकेत सातोपे/ मुंबईजम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील काही गावे कायम दहशतवादाच्या छायेत राहणारी आहेत. या गावांतील प्रत्येक नागरिकाला चोवीस तास संरक्षण पुरविणे लष्करासाठीही अशक्य आहे. त्यामुळे ‘तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई’, या उक्तीनुसार येथील ग्रामस्थांच्या हातीच शस्त्र देण्याचा निर्णय शासनाने काही वर्षांपूर्वी घेतला. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘व्हिलेज डिफेन्स कमिटी’(व्हीडीसी)मध्ये सहभागी ग्रामस्थ सध्याच्या अशांततेच्या काळात भारतीय लष्कराला सर्वतोपरी साहाय्य करण्यास सज्ज झाले आहे. सीमेपलिकडचा शत्रू कधीही येवो. आम्ही पूर्ण सज्ज आहेत, असे पुँछमधील कुलाली, हिलकाका येथील व्हीडीसीचे पदाधिकारी मोहम्मद फारूख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर नियंत्रण रेषेजवळील परिस्थिती संवेदनशील बनली आहे. विशेषत: पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सातत्याने तोफगोळे डागण्यात येत आहेत. त्यामुळे येथील नागरी जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कधीही युद्धाला तोंड फुटेल आणि आपल्या घरादारावर वरवंटा फिरेल, अशी धास्ती गावकऱ्यांनी घेतली आहे. मात्र या बाक्याप्रसंगी व्हीडीसीकडून लष्कराला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. गावकऱ्यांचे मनोबल वाढविणे, काही बितंबातम्या लष्कराला पुरविणे आणि वेळेला लष्कराच्या खांद्याला खांदा लावून लढाईला उभे राहणे, अशी सर्वप्रकारची कामे व्हीडीसीचे कार्यकर्ते उत्साहाने करीत आहेत, अशी माहिती फारूख यांनी दिली.