शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: "परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:07 IST

Jammu-Kashmir: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं.

ठळक मुद्देदहशतवादामध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 59% घट झाली.

नवी दिल्ली: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं. तेव्हापासून काश्मीरमधील विरोधी नेते राज्याला विशेष राज्याचा दर्जा परत करण्याची मागणी करत आहेत. यावर आता केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्यं केलं आहे. 

परिस्थिती सामान्य झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा दिला जाईल, असं मोठं विधान गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केलं आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, 24 जूनला दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती, त्यातही हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हाही पंतप्रधानांनी हेच विधान केलं होतं. मला विश्वास आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल. 

दहशतवादी कारवाया कमी झाल्याखासदार सस्मित पात्रा यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर प्रश्न विचारला. त्यावर नित्यानं राय म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादामध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 59% घट झाली. तर, 2020 च्या तुलनेत जून 2021 पर्यंत या घटना 31% कमी झाल्या. नित्यानंद पुढे म्हणाले की, सरकारची दहशतवाद्यांविरोधात झिरो टॉलरेंसची रणनिती आहे. मागील काही वर्षात सरकारने राज्यातील सुरक्षा मजबुत करण्यासाठी अनेक ठोस पाउलं उचलली आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370ladakhलडाख