शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरात सत्ताकोंडी फुटणार? महबूबा मुफ्ती जेटलींना भेटल्या

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नवी दिल्ली : काश्मिरात पीडीपी- भाजपा सरकार स्थापन करण्याच्या मार्गात अडसर ठरू पाहणारे कलम ३७० सह अनेक मुद्यांवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतर्गत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या(पीडीपी) अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली़ महबूबा गत आठवड्यापासून दिल्लीत तळ ठोकून आहे़

नवी दिल्ली : काश्मिरात पीडीपी- भाजपा सरकार स्थापन करण्याच्या मार्गात अडसर ठरू पाहणारे कलम ३७० सह अनेक मुद्यांवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतर्गत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या(पीडीपी) अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली़ महबूबा गत आठवड्यापासून दिल्लीत तळ ठोकून आहे़
मीडियाला दूर ठेवण्यासाठी जेटलींच्या निवासस्थानी ही बैठक ठेवली गेली़ जेटलींसोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण सिंह यावेळी हजर होते़ जम्मू-काश्मिरात भाजपाचा सहभाग असलेले आघाडी सरकार स्थापन करण्याच्या उपाययोजनांवर काम करण्यासाठी अरुण सिंह यांना नियुक्त करण्यात आले आहे़ पीडीपी आमदार हसीब दराबू यांनीही जेटलीची भेट घेतली़
राज्याच्या ८७ सदस्यीय विधानसभेत सर्वाधिक २८ सदस्य असलेली पीडीपी आणि २५ सदस्य असलेली भाजपा यांच्यात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७०, वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा, विघटनवाद्यांबद्दलचे धोरण अशा काही मुद्यांवर मतभेद आहेत़ या मुद्यांवर तोडगा काढण्याचे दोन्ही पक्षांचे प्रयत्न आहेत़
कलम ३७० आणि सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा या दोन मुद्यावर भाजपाच्या कुठल्याही प्रकारच्या नरमाईस राष्ट्रीस स्वयंसेवक संघाने तीव्र विरोध चालवल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे मुफ्ती आणि जेटली यांच्यातील चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला़
पीडीपी प्रवक्ते नईम अख्तर यांना मुफ्ती -जेटली भेटीबाबत विचारले असता, आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़