Coronavirus: आईच्या मृत्यूनंतर १० दिवसांतच महिला प्रोफेसरचा कोरोनामुळे मृत्यू; ICU बेडसाठी ट्विटरवरून मागितली होती मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 09:55 AM2021-05-19T09:55:46+5:302021-05-19T09:57:04+5:30

डॉ. नबीला विद्यार्थ्यांची अतिशय काळजी घेणाऱ्या शिक्षिका होत्या. त्यांना कविता लिहिणंही आवडायचे. अनेकदा राजकारण आणि सामाजिक समतोल याविषयावर त्या चर्चा करायच्या

Jamia professor, who put out Twitter request looking for a bed for herself, dies of Covid | Coronavirus: आईच्या मृत्यूनंतर १० दिवसांतच महिला प्रोफेसरचा कोरोनामुळे मृत्यू; ICU बेडसाठी ट्विटरवरून मागितली होती मदत

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतर १० दिवसांतच महिला प्रोफेसरचा कोरोनामुळे मृत्यू; ICU बेडसाठी ट्विटरवरून मागितली होती मदत

googlenewsNext
ठळक मुद्देआईच्या मृत्यूबद्दल नबीला यांना माहिती नव्हते. त्या आईवडीलांमुळे चिंतेत होत्या. नबीला यांची ऑक्सिजनपातळी ३२ पर्यंत खाली आली होती. शनिवारी रात्री डॉ. नबीला यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.मंगळवारी काही सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याने अनेकांना बेड्स, ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकते नाहीत. उपचाराअभावी काहींनी रुग्णालयाच्या बाहेरच जीव सोडला होता. जामिया मिलिया इस्लामिया येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. नबीला सादीक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागच्या आठवड्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ट्विटरवरून स्वत:साठी आयसीयू बेड्सची मागणी केली होती.

डॉ. नबीला सादीक(Dr Nabila Sadiq) या जेएनयूमधील पीएचडीधारक होत्या. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, २० एप्रिलपर्यंत डॉ. नबीला या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी मदत करत होत्या. १० दिवसांपूर्वीच नबीलाच्या आई नुझाट यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर त्यांचे वडीलही कोरोनाबाधित होते. ते उपचारानंतर घरी परतले होते. आईच्या मृत्यूबद्दल नबीला यांना माहिती नव्हते. त्या आईवडीलांमुळे चिंतेत होत्या. २ मे रोजी त्यांनी शेवटचं ट्विट केले होते. त्यात म्हटलं होतं की, अशीच परिस्थिती राहिली तर दिल्लीत एकही माणूस जिवंत राहणार नाही.

जामियामधील एम एचा विद्यार्थी लाराईब नेयाझी याने सांगितले  की, जेव्हा आम्हाला मॅडमच्या तब्येतीची माहिती मिळाली. तेव्हा मी काही सहकारी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या घरी गेलो. त्यानंतर आम्ही मॅडमसाठी बेड शोधू लागलो. त्यानंतर अल्शिफा हॉस्पिटलमध्ये आम्हाला बेड मिळाला. याठिकाणी कोविड चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आली. २-४ विद्यार्थी नेहमी हॉस्पिटलमध्ये राहायचे. याचदरम्यान नबीला यांच्या आईचं संजय गांधी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. परंतु मॅडमची अवस्था गंभीर असल्याने त्यांना काहीच सांगितले नाही.

डॉ. नबीला विद्यार्थ्यांची अतिशय काळजी घेणाऱ्या शिक्षिका होत्या. त्यांना कविता लिहिणंही आवडायचे. अनेकदा राजकारण आणि सामाजिक समतोल याविषयावर त्या चर्चा करायच्या. ७ मे रोजी त्यांच्या आईच्या मृतदेहावर विद्यार्थ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचवेळी नबीला यांची प्रकृतीही चिंताजनक बनली होती. आम्ही दिल्ली-NCR मधील हॉस्पिटल्सना ऑक्सिजन बेडसाठी कॉल केला होता. नबीला यांची ऑक्सिजनपातळी ३२ पर्यंत खाली आली होती. शनिवारी रात्री डॉ. नबीला यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु औषध उपचारांना त्या प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर सोमवारी डॉ. नबीला यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी काही सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. जिथे १० दिवसांपूर्वी नबीला यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले होते. नबीला यांचे वडील हे ८० वर्षाचे असून ते अलीगड मुस्लीम विद्यापीठातील निवृत्त शिक्षक आहेत. डॉ. नबीला यांच्या जाण्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

Read in English

Web Title: Jamia professor, who put out Twitter request looking for a bed for herself, dies of Covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.