जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:44 IST2025-11-16T13:43:35+5:302025-11-16T13:44:07+5:30
जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलच्या तपासादरम्यान मोठी कारवाई करण्यात आली आहे.

जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलच्या तपासादरम्यान मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस पथकांनी अनंतनागमध्ये छापा टाकला आणि हरियाणातील एका महिला डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. डॉ. प्रियंका शर्मा असं डॉक्टरचं नाव आहे. प्रियंका शर्मा ही हरियाणातील रोहतक येथील रहिवासी आहे. ती जीएमसी अनंतनाग येथे काम करत होती आणि मलखानाग परिसरात भाड्याच्या घरात राहत होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान फोन कॉल ट्रेलमध्ये तिचं नाव समोर आल्यानंतर टीमने तिचं लोकेशन शोधलं. घटनास्थळावरून एक मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करण्यात आलं आहे आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं. असं म्हटलं जात आहे की, हरियाणाची टीम तिच्या कुटुंबाची आणि इतर तपशीलांची माहिती गोळा करत आहे.
पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूरमध्ये एनआयएने ताब्यात घेतलेल्या हरियाणाच्या अल-फलाह विद्यापीठातील एमबीबीएसचा विद्यार्थी जानीसूर आलम उर्फ निसार आलम याला शनिवारी संध्याकाळी चौकशीनंतर सोडण्यात आलं. तो लुधियाना येथे राहतो आणि त्याच्या आई आणि बहिणीसोबत एका लग्नात सहभागी होण्यासाठी त्याच्या गावी आला होता.
उत्तर प्रदेशातील सुरक्षा संस्था देखील या मॉड्यूलबाबत सतर्क आहेत. राज्यातील जवळजवळ २०० काश्मिरी वंशाचे मेडिकल विद्यार्थी आणि डॉक्टर चौकशीच्या कक्षेत आले आहेत. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) उत्तर प्रदेशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयं आणि विद्यापीठांच्या संपर्कात आहे जिथे काश्मिरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कानपूर, लखनौ, मेरठ आणि सहारनपूरसह अनेक शहरं आणि संस्थांमधील कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. जैश मॉड्यूलशी संभाव्य संबंधांची चौकशी करण्यासाठी एजन्सी या सर्व ठिकाणांचा हाय स्क्रूटनी मोडवर तपास करत आहे.