शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतल्या महिलेने ३०० रुपयांची वस्तू घेतली सहा कोटींना; पोलिसांत तक्रार करताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 18:38 IST

ज्वेलर्स पिता-पुत्रांनी एका अमेरिकन नागरिकाची फसवणूक केली. या दोन आरोपींनी महिलेला ६ कोटी रुपयांचे बनावट दागिने विकले.

Crime News : राजस्थानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बनावट दागिने विकून परदेशी महिलेची कोट्यवधींची फसवणूक केल्याची घटना जयपूरमध्ये उघडकीस आली आहे. जयपूर हे रत्न आणि दागिन्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे परदेशी नागरिक खरेदी करण्यासाठी जयपूरमध्ये येत असतात. मात्र असे दागिने घेण्यासाठी अमेरिकेतून आलेल्या एका परेदशी महिलेची ६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलीय.या  महिलेकडून जयपूरच्या एका ज्वेलर्सने ६ कोटी रुपये घेत बनावट प्रमाणपत्र बनवले आणि बनावट सोन्याचे दागिने विकले. ज्वेलर्स पिता-पुत्राने बनावट दागिन्यांना सोन्याचे पॉलिश करुन परदेशी महिलेला विकले होते. 

ज्वेलर्स पिता-पुत्राने चांदीच्या साखळीवर सोन्याचे पॉलिश आणि ३०० रुपये किमतीचा मोझोनाईट स्टोन लाखो रुपये किमतीचा हिरा असल्याचे सांगून बनावट प्रमाणपत्रासह महिलेला दिला होता. फसवणुकीचा बळी ठरलेल्या अमेरिकेतील महिलेने मानक चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ज्वेलर्स पिता-पुत्र फरार झाले होते. मात्र पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या नंदकिशोर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

फसवणूक झालेल्या महिलेचे नाव चेरीश असून तिने सांगितले की ती जयपूरमधून दागिने खरेदी करून अमेरिकेत विकण्याचा व्यवसाय करते. २०२२ मध्ये तिची भेट आरोपी गौरव सोनीशी झाली होती. मानक चौक परिसरात त्याचे दागिन्यांचे शोरूम आहे. दोन वर्षांत चेरीशने गौरव सोनीकडून सुमारे ६ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले होते. या दागिन्यांची किंमत मूळ किंमत ही ३०० ते ६०० रुपये असायची. मात्र ते दागिने कोट्यवधी रुपयांना चेरीशला विकली गेली. एप्रिलमध्ये अमेरिकेत झालेल्या एका ज्वेलरी शोमध्ये चेरीशला तिने विकत घेतलेले दागिने बनावट असल्याचे आढळून आले.

या सगळ्या प्रकारानंतर चेरीशने जयपूरला येऊन ज्वेलर्स गौरव सोनी आणि त्याचे वडील राजेंद्र यांना बनावट दागिने विकण्याबाबत जाब विचारला. त्यावर सोनी पिता पुत्राने चेरीशला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तिला हकलवून दिले. त्यानंतर चेरीशने अमेरिकन दूतावासात तक्रार करून न्याय मागितला. त्यानंतर गौरव आणि त्याच्या वडिलांविरुद्ध मानक चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त डीसीपी बजरंगसिंह शेखावत यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. हॉलमार्क प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या ज्वेलर्सकडे कोणत्याही दर्जाची उपकरणे नसून बनावट प्रमाणपत्रे जारी केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस