शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

आयटीसी चेअरमन वाय. सी. देवेश्वर काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 5:40 AM

प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुरुवातीला मुख्यत: सिगारेट उत्पादन क्षेत्रात असलेल्या आयटीसीने देवेश्वर यांच्या नेतृत्वाखाली एफएमसीजी, आतिथ्य, आयटी आणि इतर अनेक क्षेत्रात यशस्वी झेप घेतली.७२ वर्षीय देवेश्वर हे २०१७ मध्येच कंपनीच्या सक्रिय चेअरमन व सीईओपदावरून पायउतार झाले होते. तथापि, अ-कार्यकारी चेअरमन म्हणून ते शेवटच्या श्वासापर्यंत संचालक मंडळावर होते. गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवेश्वर यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.आयटीसीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी सांगितले की, ‘आयटीसीचे चेअरमन वाय. सी. देवेश्वर यांच्या निधनाबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करीत आहोत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कंपनी भरभराटीला आली. त्यांचे व्यावसायिक मॉडेल आज ६ दशलक्ष लोकांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे.’देवेश्वर यांनी १९६८ मध्ये आयटीसीमध्ये प्रवेश केला होता. ११ एप्रिल १९८४ रोजी त्यांना संचालक मंडळावर घेण्यात आले. १ जानेवारी १९९६ रोजी ते कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि चेअरमन बनले. उद्योगजगतातील दीर्घकाळपर्यंत सर्वोच्च कार्यकारी पदावर काम करणाऱ्या मोजक्या लोकांत त्यांचा समावेश होतो. आयटीसी ही मुख्यत: सिगारेटचे उत्पादन करीत असे. देवेश्वर यांनी कंपनीला एफएमसीजी, आतिथ्य, कागद, कृषी आणि माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात उतरवून यशस्वीही केले.देवेश्वर यांनी कंपनीचा ताबा घेतला, तेव्हा कंपनीचा महसूल ५,२०० कोटींपेक्षही कमी होता, तर करपूर्व नफा अवघा ४५२ कोटी रुपये होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे कंपनी भरभराटीला आली. २०१७-१८ मध्ये कंपनीचा महसूल ४४,३२९.७७ कोटी आणि शुद्ध नफा ११,२२३.२५ कोटी रुपयांवर गेला.

टॅग्स :Deathमृत्यू