'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 10:16 PM2024-02-24T22:16:02+5:302024-02-24T22:17:21+5:30

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे.

'It will be difficult for Congress to win even 100 seats in the Lok Sabha', Prashant Kishor's big prediction on BJP's 370 in lok sabha elections 2024 | 'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

माजी निवडणूक रणनीतीकार तथा जन सूरज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. तसेच, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र, यावेळीही ते पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करू शकता, अशे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनी सोबत बोलत होते. यावेळी, काँग्रेस या निवडणुकीत 100 चा आकडा पार करेल का? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, लोकसभेतील काँग्रेसच्या सध्याच्या जागांच्या संख्येत मोठा बदल होण्याची शक्यता नाही. जागांची संख्या 50-55 झाली तर देशाचे राजकारण बदलणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र, काँग्रेस 100 चा आकडा पार करेल असे वाटत नाही. आजच्या घडीला हे अवघड आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'भाजपच्या 370 वर काय म्हणाले प्रशांत किशो' -
भाजपच्या 370 जागांच्या लक्ष्यासंदर्भात विचारले असता किशोर म्हणाले, "भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. लोकांनी 370 चे लक्ष्य खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला आपले लक्ष्य निर्धारित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी हे साध्य केले तर ते खूप छान, मात्र हे शक्य झाले नाही, तर पक्षाने आपली चूक मान्य करण्याइतपत विनम्र असायला हवे." किशोर यांच्या मते, 2014 नंतर अशा 8-9 निवडणुका झाल्या ज्यात भाजपला आपले निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही.

'भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात काय म्हणाले पीके? -
प्रशांत किशोर म्हणाले, 'भाजप एकट्याच्या बळावर 370 जागा मिळवू शकणार नाही, असे मी म्हणू शकतो. मी, ही शक्यता जवळजवळ शून्य मानतो. असे घडल्यास मला आश्चर्य वाटेल. किशोर म्हणाले, संदेशखालीसारख्या घटना घडल्यास, ते सत्ताधारी पक्षासाठी निश्चितपणे नुकसानाचे कारण ठरेल. महत्वाचे म्हणजे, त्यांचे म्हणणे होते की, भाजप 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये जिंकलेल्या जागांवरून खाली येणार नाही. गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'बाबत किशोर म्हणाले की, लोकसभा निवडणुका जवळ आली असताना, ही यात्रेची वेळ नाही.

Web Title: 'It will be difficult for Congress to win even 100 seats in the Lok Sabha', Prashant Kishor's big prediction on BJP's 370 in lok sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.