शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीची उंची वाढविणे हा आमचा अधिकारच!, महाराष्ट्राचा त्रागा निंदनीय; कर्नाटकची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:19 IST

केंद्रीय मंत्र्यांची घेतली भेट

संदीप परांजपेसांगली : ‘‘अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटर वाढविण्याबाबत महाराष्ट्र सरकार नाहक त्रागा करत आहे. हे निंदनीय आहे. कृष्णा पाणीवाटप लवादाच्या निकालानुसार अलमट्टीची उंची वाढवणे हा कर्नाटकचा अधिकारच आहे,’’ असे प्रतिपादन कर्नाटक भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने सांगितले. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांना दिल्लीत भेटून त्यांनी आपली बाजू मांडली.केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी आणि खासदार बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी दिल्लीत मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बोम्मई पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन अलमट्टीच्या उंची वाढीस विरोध व्यक्त केला. त्यामुळेच आम्ही शिष्टमंडळासह मंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थितीची माहिती दिली.

वाचा- अलमट्टी धरण ९८ टक्के भरले; ४२ हजार ५०० क्युसेकचा विसर्ग सुरुकृष्णा लवादाने धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकार आणि तीन राज्यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात धरणामुळे पूर येणार नाही असे सांगणारा अहवाल यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. २००५ मध्ये पूर आला, तेव्हादेखील केंद्रीय जल आयोगाने अलमट्टी धरणामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर आला नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा दावा चुकीचा आहे. या शिष्टमंडळात भाजपचे खासदार गोविंदा काराजोळ, पी. सी. गड्डीगौड जिगाजीनागी व अन्य खासदारांचा समावेश होता.

जलद सुनावणीसाठी प्रयत्नबसवराज बोम्मई म्हणाले, अलमट्टीची उंची वाढवणे हा आमचा अधिकार आहे. तो आम्ही केंद्रीय मंत्र्यांना पटवून दिला आहे. राजपत्रात अधिसूचना काढण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करू. हे प्रकरण जलद सुनावणीसाठी यावे यासाठी राज्य सरकारने सर्व शक्ती वापरावी, अशी सूचना आम्ही कर्नाटक सरकारला केली आहे.