शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

तिहेरी तलाक विरोधात लढणा-या इशरत जहाँ यांची दोन मुलं बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 8:02 PM

तिहेरी तलाक विरोधात न्यायालयात धाव घेणा-या याचिकाकर्त्या इशरत जहाँ यांनी आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. 

कोलकाता, दि. 31 -  तिहेरी तलाक विरोधात न्यायालयात धाव घेणा-या याचिकाकर्त्या इशरत जहाँ यांनी आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. पश्चिम बंगालच्या हावडाममध्ये राहणा-या इशरत जहाँ यांनी गुरुवारी हावडाच्या गोलाबारी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर इशरत जहाँ यांनी आपल्याला सासरच्या मंडळींकडून आणि शेजा-यांकडून धमकीचे फोन आल्याचे म्हटले होते. सध्या  इशरत जहाँ हावडाच्या पिलखाना भागात आपल्या चार मुलांना घेऊन राहतात. इशरत जहाँ यांना 2014 मध्ये त्यांच्या नव-याने दुबईहून फोनवरुन तलाक दिला होता.   गेल्या आठवड्यापूर्वी तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. यामध्ये तिहेरी तलाक ही प्रथा बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या तिहेरी तलाकवर बंदी घालताना केंद्र सरकारला सहा महिन्यात यासंबंधी कायदा तयार करण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बहुमताने हा निर्णय दिला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायाचे   वेगवेगळ्या स्तरांतून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले आहे. मात्र, काही कट्टरपंथीयांकडून या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला आहे. तिहेरी तलाक विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच प्रमुख महिलांमध्ये इशरत जहाँ  यांच्यासह शायरा बानो, आफरीन रहमान, अतिया साबरी, गुलशन परवीन यांचा समावेश आहे. 

कोण आहेत या पाच महिला...

इशरत जहाँतिहेरी तलाक विरोधात कोर्टात जाणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालच्या हावडामधील इशरत जहाँ यांचाही समावेश आहे. इशरत यांच्या पतीने दुबईतून फोनवरून त्यांना तलाक दिला होता. इशरत जहाँ यांना लग्नानंतर पंधरा वर्षांनी पतीने तिहेरी तलाक दिला. त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं, 2001 मध्ये त्यांचं लग्न झालं असून त्यांना मुलं आहेत. त्या मुलांना त्यांच्या पतीने जबरदस्तीने त्यांच्याकडे ठेवलं आहे. आपली मुलं परत मिळावी तसंच पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी इशरत यांनी याचिकेत केली. तिहेरी तलाक बेकायदेशीर असून मुस्लिम महिलांच्या अधिकाराची गळचेपी असल्याचं त्यांनी याचिकेत म्हंटलं होतं.

शायरा बानोमार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शायरा बानो यांना लग्नानंतर 15 वर्षांनी त्यांच्या पतीने तिहेरी तलाक दिला. ऑक्टोबर 2015मध्ये शायरा बानो यांना तिहेरी तलाक दिला होता. त्यांना 2 अपत्य आहेत. बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं.  मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं. तिहेरी तलाक म्हणजे संविधानातील घटनाक्रम 14 आणि 15 च्या अंतर्गत मिळणाऱ्या मुलभूत अधिकारांचं उल्लघन आहे, असं शायरा बानो यांनी त्यांच्या अर्जात म्हंटलं होत.

आफरीन रहमानजयपूरच्या 25 वर्षीय आफरीन रहमान हिनेसुद्धा तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आफरीन यांचं एका मेट्रोमोनिअल साइटवरून लग्न जमलं होतं. त्यांनी 2014 मध्ये लग्न केलं.आफरीनच्या पतीने तिला स्पीड पोस्टच्या माध्यमातून तिहेरी तलाक दिला होता. जे अत्यंत चुकीचं होत. आफरीन रहमान हीने कोर्टाकडे तिला न्याय मिळण्याची मागणी केली होती. पती आणि सासरची लोक हुंड्यांची मागणी करतात, त्यासाठी मला मारहाण करून घराच्या बाहेर काढल्याचा आरोप आफरीन रहमान हिने केला होता. 

अतिया साबरीउत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील अतिया साबरी यांच्या पतीने त्यांना एका कागदावर तीन वेळा तलाक हा शब्द लिहून दिला होता आणि अतियाशी सगळे संबंध तोडले होते. 2012मध्ये अतियाचं लग्न झालं होतं. त्यानंतर 12 डिसेंबर 2015 मध्ये त्यांना पतीने तिहेरी तलाक दिला. अतिया यांना दोन मुली आहेत. दोन मुली झाल्याने नाराज झालेल्या पतीने आणि सासरच्या लोकांनी अतिया यांना घराच्या बाहेर काढलं, असा आरोप त्यांनी केला. तसंच हुंड्यासाठीही त्यांना त्रास दिला जात होता.

गुलशन परवीनउत्तर प्रदेशाच्या रामपूरमध्ये राहणाऱ्या गुलशन परवीन यांना त्यांच्या पतीने दहा रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर तलाकनामा पाठविला होता. परवीन यांचं 2013मध्ये लग्न झालं होतं तर त्यांना 2015मध्ये पतीने तिहेरी तलाक दिला.त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस