इस्रायल-अमेरिका आणि इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील तणाव प्रचंड वाढला आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर झाला आहे. गेल्या आठवडाभरात भारताून युरोपला जाणाऱ्या विमानांच्या भाड्यात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून दुबई मार्गावरील तिकीट दर तब्बल ६० ते ८० टक्क्यांनी वधारले आहेत. प्रवासी कंपन्यांनी म्हटले आहे की, पुढील १५ दिवसांत प्रवास बुक करणाऱ्यांना भाडेवाढीचा सामना करावा लागत आहे.
दुबई आणि युरोप मार्गावर मोठा परिणाम -'Pickyourtrail' या ट्रॅव्हल कंपनीच्या आकडेवारीनुसार, विमान उड्डाणे मर्यादित असल्याने भारत-दुबई कॉरिडॉरवर एकेरी प्रवासाचे भाडे ८० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या आठवड्यात मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली असून, त्यापैकी ५० ते ६५ टक्के उड्डाणे केवळ दुबई मार्गावरील आहेत. युरोपीय देशांचा विचार करता, जर्मनी आणि पोर्तुगालसाठीचे भाडेही प्रचंड वाढले आहे. दिल्ली-फ्रँकफर्ट मार्गावरील इकॉनॉमी क्लासचे सर्वात स्वस्त तिकीट तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. असून अनेक दिवसांचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे.
भाडेवाढीचं मुख्य कारण काय? -हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्र (Air Space) बंद असल्याने विमानांना लांबच्या पर्यायी मार्गाने जावे लागत आहे. याशिवाय, विमान विम्याचा खर्च, इंधनाचे वाढते दर आणि जागांची मर्यादित हेही दरवाढीमागील मुख्य कारणे आहेत. हवाई वेळापत्रकातील बदल आणि संचालन प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे काही रूट्सवर टूर पॅकेजेसही महागले असल्याचे 'IATO' चे अध्यक्ष रवी गोसाईं यांनी सांगितले.
Web Summary : Iran conflict impacts flights. Europe fares up 40%, Dubai 80%. Alternative routes, insurance, fuel costs, limited seats are factors. Tour packages also pricier.
Web Summary : ईरान युद्ध का असर विमान किराए पर। यूरोप का किराया 40% और दुबई का 80% बढ़ा। वैकल्पिक मार्ग, बीमा, ईंधन लागत, सीमित सीटें कारण। टूर पैकेज भी महंगे।