शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यामध्ये वाढले अवैध व्हेंडर

By admin | Updated: February 7, 2015 02:04 IST

रेल्वेगाड्यामध्ये वाढले अवैध व्हेंडर

रेल्वेगाड्यामध्ये वाढले अवैध व्हेंडर
सात जणांना पकडले : आरपीएफने राबविले अभियान
नागपूर : परवाना नसताना रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकणाऱ्या अवैध व्हेंडरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकल्यामुळे त्याचा प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी कारवाई करून विविध रेल्वेगाड्यातील ७ अवैध व्हेंडरची धरपकड केली.
रेल्वे प्रवासात पेंट्रीकार नसलेल्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांच्या खाण्यापिण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे गाडीतील अवैध व्हेंडरकडील खाद्यपदार्थ विकत घेऊन खाण्याची पाळी त्यांच्यावर येते. निकृष्ट दर्जाचे भोजन असल्यामुळे अशा अवैध व्हेंडरकडील खाद्यपदार्थांचा प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकताना दिसून येतात. शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या विविध रेल्वेगाड्यांची तपासणी केली. यात ७ अवैध व्हेंडर खाद्यपदार्थ विकताना आढळले. त्यांना आरपीएफ ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध रेल्वे ॲक्ट १४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रवाशांनी अवैध व्हेंडरकडुन खाद्यपदार्थ विकत घेऊन खाणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
...............