शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

International Yoga Day 2018 : देशभरात 'योगोत्सव'; मोदींसह सर्वसामान्यांचा उत्साहात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 7:02 AM

जगभरात साजरा होतोय चौथा योग दिवस

देहरादून: आज जगभरात चौथा योग दिन साजरा होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये योग करत आहेत. मोदी 55 हजार जणांसह योगासनं करत आहेत. पंतप्रधान मोदींसह व्यासपीठावर उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. के. के. पॉल, मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, केंद्रीय आयुष मंत्री हरक सिंह रावत उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींनी योगासनांना सुरुवात करण्याआधी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'उत्तराखंड कित्येक दशकांपासून योगविद्येचं केंद्र राहिला आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या दृष्टीनं या दिवसाचं महत्त्व खूप मोठं आहे. संपूर्ण जगात आज योग दिन साजरा होत आहे. भारतीयांच्या दृष्टीनं ही अभिमानाची बाब आहे,' असं मोदी म्हणाले. 'जेव्हा फूट पाडणाऱ्या शक्तींचं सामर्थ्य वाढतं, तेव्हा समाजाच्या घटकांमधील दरी वाढते. समाजात, आयुष्यात जेव्हा तणाव वाढतो, तेव्हा योग सर्वांना जोडतो,' असं प्रतिपादन मोदींनी केलं.

Live Updates:

- अरुणाचल प्रदेशात आयटीबीपीच्या जवानांची नदीत योगासनं

- आयटीबीपीच्या जवानांचा तब्बल 18 हजार फूट उंचीवर योग

- आयएनएस सह्याद्रीवर योगासनं

- गेट वे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांकडून योगासनांचं सादरीकरण

- मुंबईत नौदल कर्मचाऱ्यांची योगासनं

- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची मुंबईत योगासनं

- सीआयएसएफच्या जवानांची मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमध्ये योगासनं

- संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात योग दिनाचा उत्साह; शेकडो जणांनी केली योगासनं

- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनात योगासनं

- आयटीबीपीच्या जवानांकडून तब्बल 18 हजार फूट उंचीवर योगासनं

- विशाखापट्टणम येथील ईस्टर्न नेव्हल कमांडच्या कर्मचाऱ्यांची आयएनएस ज्योतीवर योगासनं

 

- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू मुंबईत योग करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

- पंतप्रधान मोदींकडून योगासनांचं सादरीकरण

 

- पंतप्रधान कार्यालयाकडून देहरादूनमधील योगदिनाचा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

 

- वाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांची सहकाऱ्यांच्या साथीनं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये योगासनं

 

- गुजरातमधील अहमदाबादमध्ये योगदिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात, मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित

- कोटामध्ये रामदेव बाबांकडून योगासनं सादर; राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित

- देशभरातील 5 हजार ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनNarendra Modiनरेंद्र मोदीBaba Ramdevरामदेव बाबा