शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय धम्म परिषद -१

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

फोटो - प्रिन्सेस मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा आणि भदंत बानागल उपतिस्स नायक थेरा

फोटो - प्रिन्सेस मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा आणि भदंत बानागल उपतिस्स नायक थेरा

बुद्धा स्पिरिच्युअल पार्क येथे
आंतरराष्ट्रीय धम्म संमेलन

थायलंडच्या राजकुमारी मॉम लुयाँग जेआनकुरा मुख्य अतिथी : भदंत बानागल उपतिस्स नायक थेरो करणार उद्घाटन

नागपूर : अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने बुद्धा स्पिरिच्युअल पार्क सिंहोरा कन्हान येथे आंतरराष्ट्रीय धम्म संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसीय या धम्म संमेलनामध्ये थायलंडच्या राजकुमारी (प्रिन्सेस) मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यासंबंधात अधिक माहिती देताना बुद्धा स्पिरिच्युअल पार्कचे संस्थापक नितीन गजभिये यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले की, १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत हे धम्म संमेलन बुद्धा स्पिरिच्युअल पार्क येथे होणार आहे. श्रीलंका येथील महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष भदंत बानागल उपतिस्स नायक थेरा यांच्या हस्ते धम्म संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. धम्म संमेलनामध्ये बांगलादेशचे भदंत वरसंबोधी, भारतातील श्रीलंकेचे उच्चायुक्त प्रो. सुदर्शन सेनवीरत्ने, भदंत सदानंद महास्थवीर, भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदंत विमलकीर्ती गुणसिरी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील आपले विचार व्यक्त करतील. धम्म संमेलनामध्ये बौद्ध पूजा पाठ आणि धम्मसंगीतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या धम्म संमेलनासाठी थायलंडच्या प्रिंसेस मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा या विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. रविवारी त्यांचे नागपुरात आगमन होईल. सोमवार १६ फेब्रुवारी रोजी त्या नागपूर शहरातील विविध बुद्धविहारांना भेटी देतील. दीक्षाभूमीचे दर्शन घेतील. तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल, बुद्धभूमी खैरी, नागलोक, इंदोरा बुद्ध विहार आदींना भेटी देतील.
पत्रपरिषदेत प्रसिद्ध आंबेडकरी गायक प्रकाश पाटणकर, आवाज इंडिया टीव्ही चॅनलचे संचालक अमन कांबळे, प्रीतम बुलकुंडे, राजीव झोडापे उपस्थित होते.