सिलिंडरचा साठा जिवावर उठला! कार चार्जिंग करताना शॉर्ट सर्किट, ४ सिलेंडर फुटले; ५ मुलांसह एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:09 IST2026-03-18T08:08:04+5:302026-03-18T08:09:39+5:30

Indore Preeti Nagar Fire: इंदूरमध्ये इलेक्ट्रिक कार चार्जिंगमुळे लागलेल्या आगीत ४ सिलेंडरचा स्फोट झाला. ५ मुलांसह ७ जणांचा मृत्यू. वाचा सविस्तर वृत्त.

Indore Fire: Cylinder stock comes to life! Short circuit while charging electric car, 4 cylinders explode; 7 members of the same family including 5 children die | सिलिंडरचा साठा जिवावर उठला! कार चार्जिंग करताना शॉर्ट सर्किट, ४ सिलेंडर फुटले; ५ मुलांसह एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

सिलिंडरचा साठा जिवावर उठला! कार चार्जिंग करताना शॉर्ट सर्किट, ४ सिलेंडर फुटले; ५ मुलांसह एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

इंदूर: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये मंगळवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि मन सुन्न करणारी घटना घडली. प्रीती नगर भागात इलेक्ट्रिक कार चार्ज करत असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. या आगीत घरात ठेवलेल्या ४ गॅस सिलेंडरचा एकापाठोपाठ एक स्फोट झाला, ज्यामध्ये ५ निष्पाप मुलांसह कुटुंबातील ७ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला.

घराबाहेर उभी असलेली इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावलेली होती. रात्रीच्या वेळी चार्जिंग पॉइंटमध्ये शॉर्ट सर्किट झाले. घरामध्ये १५ हून अधिक गॅस सिलिंडर ठेवलेले होते. कारच्या चार्जिंग पॉईंटला लागलेली आग वेगाने घराच्या आत पसरली. घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर आगीच्या उष्णतेमुळे चार सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की घरातील व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. 

रात्रीची वेळ असल्याने सर्वजण गाढ झोपेत होते. मृतांमध्ये ७ महिने ते १२ वर्षे वयोगटातील ५ मुलांचा समावेश आहे. तिघांना वाचविण्यात आले असून हे घर पॉलिमरचा व्यापाऱ्याचे होते.शिवाय घरामध्ये स्फोटक रसायने देखील होती. यामुळे भीषण आग लागली.  त्याच्या घरात एवढे सिलिंडर कुठून आले, याचा तपास पोलीस करत आहेत. 

बचाव कार्यात अडथळे
परिसरातील गल्ल्या अत्यंत अरुंद असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. स्थानिक नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, पण सिलेंडरच्या स्फोटांमुळे आगीची तीव्रता एवढी होती की कोणालाही जवळ जाता आले नाही. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाच्याही डोळ्यात पाणी आले होते.

Web Title : इंदौर: इलेक्ट्रिक कार चार्जिंग से शॉर्ट सर्किट, सिलेंडर विस्फोट में 7 की मौत

Web Summary : इंदौर में भीषण हादसा: इलेक्ट्रिक कार चार्जिंग के दौरान शॉर्ट सर्किट से सिलेंडर फटे, 5 बच्चों समेत 7 की दर्दनाक मौत। संकरी गलियों के कारण बचाव में देरी हुई।

Web Title : Indore: Electric car charging short circuit, cylinder blasts kill 7.

Web Summary : Indore tragedy: Electric car short circuit ignited gas cylinders, causing fatal blasts. Seven perished, including five children, in the devastating fire. Narrow lanes hampered rescue efforts.