शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चीन, पाकिस्तान सावधान, भारताकडे आहे विक्रांत! सागरी सीमांची अभेद्य तटबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 08:43 IST

स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता भारताने प्राप्त केली असल्याचे यातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानी नौदलाला भारतापासून अधिक सावध रहावे लागणार आहे.

‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका सरावाच्या अंतिम टप्प्यात आहे. आपल्या सागरी सीमांची तटबंदी अभेद्य करण्यात ‘आयएनएस विक्रांत’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका बनविण्याची क्षमता भारताने प्राप्त केली असल्याचे यातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानी नौदलाला भारतापासून अधिक सावध रहावे लागणार आहे. भारताची सागरी प्रहारक्षमता वाढणार असल्याने दोन्ही शत्रूदेशांना धडकी भरली आहे. काय आहे ही युद्धनौका आणि हा प्रकल्प भारतासाठी का महत्त्वाचा आहे, जाणून घेऊ या.

आयएनएस विक्रांत असे नाव का देण्यात आले आहे?भारताच्या पहिल्यावहिल्या युद्धनौकेचे नाव ‘आयएनएस विक्रांत’ हेच होते.१९,५०० टन वजनाची ही युद्धनौका १९६१ मध्ये इंग्लंडकडून विकत घेण्यात आली होती. १९७१च्या पाकविरुद्धच्या युद्धात या युद्धनौकेने मोलाची कामगिरी बजावली होती. १९९७ मध्ये ‘आयएनएस विक्रांत’ नौदलातून निवृत्त झाली. तिच्या स्मरणार्थ नव्या नौकेला तिचे नाव देण्यात येणार आहे. ‘आयएसी-१’ असे नाव का देण्यात आले आहे?‘आयएनएस विक्रांत’ या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची रचना आणि बांधणी देशातच करण्यात आली आहे. म्हणून या प्रकल्पाला स्वदेशनिर्मित विमानवाहू नौका (आयएसी असे संबोधले जाते. विमानवाहू युद्धनौकेची उभारणी ही भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. यातून भारतीय नौदलाची ताकद सुस्पष्ट होते. १४ डेक्स नौकेवर असतील१७०० नौसैनिकांना राहता येईल२३०० नौकेवरील दालनांची संख्यासर्व प्रकारची लढाऊ विमाने यावरून वाहून नेता येतील.नव्या ‘विक्रांत’ची वैशिष्ट्ये काय आहेत?५९ मीटर उंची२६२ मीटर लांबी६२ मी़टर रुंदी४०,००० टन वजनकमाल वेग : २८ सागरी मैल प्रतितासकिमान वेग : १८ सागरी मैल प्रतितास