शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 05:45 IST

भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.

बीजिंग : भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या या निर्णयाने भारत-चीनदरम्यान गेल्या काही वर्षांत तणावपूर्ण झालेल्या संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. भारत सरकारने २०२० मध्ये, मुख्यतः कोविड-१९ महासाथीमुळे, चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा स्थगित केला होता. मात्र, त्यानंतर लडाखमधील गलवान खोऱ्यातील सैन्यसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध कायम राहिले होते.भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदनात सांगितले की, चिनी नागरिक गुरुवारपासून पर्यटक व्हिसासाठी अर्ज करू शकतात. बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझू येथील भारतीय व्हिसा केंद्रांमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जप्रक्रियेबाबत आणि आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहितीही अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.सकारात्मक पाऊल - चीन भारताच्या या निर्णयाचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, ‘हे एक सकारात्मक पाऊल आहे. सीमा ओलांडून प्रवास सुलभ करणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर निर्णय हा निर्णय भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर घेण्यात आला आहे. जयशंकर यांनी १४-१५ जुलै रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी चीनला भेट दिली होती.त्यांनी या दौऱ्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि उपराष्ट्रपती हान झेंग यांच्याशीही संवाद साधला. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी जवळपास पाच वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर यात्रादेखील सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक दिशा मिळत असल्याचे दिसते. 

टॅग्स :chinaचीनVisaव्हिसाIndiaभारत