शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

२०३० पर्यंत भारतीय रेल्वे होणार १०० टक्के उत्सर्जनमुक्त -पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 05:04 IST

गोयल यांनी तीनदिवसीय ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेत ३0 देशांतील ५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे २०३० पर्यंत जगातील पहिली १०० टक्के हरित रेल्वे बनेल. आपल्या रेल्वेचे शुद्ध उत्सर्जन (नेट एमिशन) शून्यावर आलेले असेल, असे प्रतिपादन वाणिज्य व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.गोयल यांनी तीनदिवसीय ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेत ३0 देशांतील ५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले. ७५ सत्रांत जगातील २५० वक्त्यांनी परिषदेला संबोधित केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारत पुन्हा एकदा क्रियाशील होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आम्ही नेहमीच जलद गतीने पूर्ववत होण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. यावेळीही हेच दिसून येत आहे. कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या संकटातूनभारतीय अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. तथापि, प्रत्येक आव्हान भारताने यशस्वीरीत्या पेलले आहे. प्रत्येक संकटातून भारत फार जलद गतीने सावरला आहे. प्रत्येकवेळी तो अत्यंत वेगाने सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. याहीवेळी भारताच्या याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वेच्या १०० टक्के विद्युतीकरणास मंजुरी दिली आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठी रेल्वे आहे. विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वे जगातील पहिली १०० टक्के हरित रेल्वे असेल. भारतीय रेल्वेचे शुद्ध-उत्सर्जन शून्य असेल. विशेष म्हणजे १०० टक्के उत्सर्जनमुक्त असलेली भारतीय रेल्वे जगातील सर्वांत मोठी रेल्वेही असेल, असे गोयल यांनी या परिसंवादात सांगितले.शंभर टक्के विद्युतीकरणाची योजना- १,२०,०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रेल्वेमार्ग भारतात आहेत. हे सर्व रेल्वेमार्ग १00 टक्के विद्युतीकृत करण्याची सरकारची योजना आहे. पंतप्रधानांनी या प्रकल्पास मान्यता दिली आहे.- आमच्या नियोजनानुसार, २०३० पर्यंत विद्युतीकरणाचा हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. सर्व मार्गांचे विद्युतीकरण तोपर्यंत पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वे