शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानी क्लबमध्ये ' नो एन्ट्री'

By admin | Updated: October 29, 2015 10:26 IST

भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्याचे प्रयत्न होत असतानाच कराचीतील सिंध क्लबने भारतीय उच्चायुक्त राघवन यांना क्लबमध्ये प्रवेश देण्यास नकार दिल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २९ -  भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्याचे प्रयत्न होत असतानाच पाकिस्तानमधील एका क्लबने भारताचे उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन  प्रवेश देण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर येत आहे. विशेष म्हणजे भारताचे उच्चायुक्त राघवन व त्यांच्या कुटुंबाला या क्लबमध्ये होणा-या एका कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण मिळालेले असतानाही ऐनवेळेस घूमजाव करत क्लबच्या अधिका-यांनी राघवन यांच्या प्रवेशास नकार दर्शवला. २६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून दिल्ली व कराचीतील सूत्रांनीही या घटनेला दुजोरा दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. 
कराचीतील अतिशय जुना व प्रतिष्ठित अशा 'सिंध' क्लबमध्ये होणा-या एका विशेष कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राघव कराचीला गेले होते, मात्र सिंध क्लबच्या अधिका-यांनी कोणतेही कारण न देता राघवन यांना प्रवेश देण्यास नकार दिला. मोहम्मद अली जीना यांचा नातू लिकायत मर्चंट को- चेअरमन असलेल्या 'पाकिस्तान-इंडिया सिटिझन्स फ्रेंडशिप फोरम' या ग्रुपद्वारे सिंध क्लबमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आणि त्या कार्यक्रमासाठी आयोजकांनी भारतीय उच्चायुक्त राघवन यांनाही निमंत्रण दिले होते.  कराचीत कुटुंबियांसह एका हॉटेलमध्ये उतरलेल्या राघवन यांना क्लबने प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचा अधिकृत संदेश क्लबच्या अधिका-यांनी दिला, मात्र त्यामागील कारण त्यांना विशद करण्यात आले नाही. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची अतिशय गंभीर दखल घेतली आहे. 
शिवसेनेने मुंबईत पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली खान यांचा कार्यक्रम होऊ न दिल्यानेच, त्याच्या निषेधार्थ सिंध क्लबच्या अधिका-यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत असली तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.