भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 20:38 IST2026-01-15T20:34:52+5:302026-01-15T20:38:19+5:30
ताब्यात घेतलेल्या ९ पाकिस्तानी क्रू मेंबर्सना पुढील चौकशीसाठी पोरबंदर येथे आणले आहे.

भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
अरब सागरात गस्तीदरम्यान भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) ने मोठी कारवाई करत भारतीय जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या प्रवेश करणारी एक पाकिस्तानी मच्छीमारी नौका जप्त केली आहे. या नौकेवर एकूण ९ पाकिस्तानी क्रू सदस्य होते. सर्वांना पुढील चौकशीसाठी पोरबंदर येथे आणले जात आहे.
१४ जानेवारीच्या रात्री घडले नाट्य
१४ जानेवारीच्या रात्री अरबसागरात नियमित गस्त घालत असताना, इंटरनॅशनल मॅरिटाइम बाउंड्री लाईनजवळ भारतीय जलक्षेत्रात एक संशयास्पद पाकिस्तानी मच्छीमारी नौका आढळून आली. ही नौका पाकिस्तान कडून भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी करत असल्याचे लक्षात येताच, कोस्ट गार्डने तिला थांबण्याचा इशारा दिला.
In a swift and precise night operation, an @IndiaCoastGuard Ship whilst on patrol in #Arabian sea sighted a #Pakistani Fishing Boat inside #Indian waters near the International Maritime Boundary Line on 14 Jan 26. On being challenged, the boat attempted to flee towards Pakistan… pic.twitter.com/DEz1aPBOed
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) January 15, 2026
पाकिस्तानी क्रूची पळापळ
इशारा दिल्यानंतर संबंधित नौकेने अंधाराचा फायदा घेत पाकिस्तानच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंडियन कोस्ट गार्डचे जहाज नौकेच्या दिशेने वळताच नौकेवरील पाकिस्तानी क्रूची एकच पळापळ उडाली. कोस्ट गार्डच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे ही नौका भारतीय जलक्षेत्रातच रोखण्यात आली आणि जवानांनी नौकेवर चढून ताबा घेतला.
‘अल-मदीना’ नौका जप्त; पोरबंदरकडे रवाना
जप्त करण्यात आलेल्या पाकिस्तानी नौकेचे नाव ‘अल-मदीना’ असून, त्यावर एकूण ९ क्रू सदस्य होते. ही नौका सध्या ICG च्या निगराणीखाली पोरबंदरकडे नेण्यात येत आहे. तिथे संबंधित तपास यंत्रणांकडून नौकेची सखोल तपासणी तसेच क्रू सदस्यांची संयुक्त चौकशी करण्यात येणार आहे.
सागरी सुरक्षेसाठी कोस्ट गार्डची सतत दक्षता
ही कारवाई देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण, अवैध घुसखोरी रोखणे आणि समुद्रमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची सततची सज्जता आणि कटिबद्धता दर्शवते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.