'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:59 IST2025-10-03T16:58:00+5:302025-10-03T16:59:06+5:30

Army Chief issues stern warning to Pakistan: भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला.

Indian Army Chief warning to Pakistan: 'We will not be patient anymore; we will wipe Pakistan off the map of the world map, | 'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

Indian Army Chief warning to Pakistan: राजस्थानच्या अनूपगड येथून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला. त्यांनी म्हटले की, 'ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये आम्ही संयम ठेवला, पण यापुढे संयम ठेवणार नाही. ऑपरेशन सिंदूर 2.0 मध्ये अशी कारवाई करू की, पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. पाक सरकारने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले नाही, तुम्हाला जगाच्या नकाशावर ठेवणार नाही.'

ऑपरेशन सिंदूर कायम लक्षात राहील

जनरल द्विवेदी पुढे म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यापैकी सात लष्कराने आणि दोन ठिकाणांवर हवाई दलाने हल्ला केला. यात पाकिस्तानी लष्करातील 100 पेक्षा जास्त जवान आणि असंख्य दहशतवादी ठार झाले. या कारवाईचे पुरावे भारताने जगाला दाखवले आहेत. ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या शौर्याचा आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे.'

लष्कर प्रमुखांनी पुढे सांगितले की, 'पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले, तेव्हा संपूर्ण जग भारताच्या बाजुने होते. या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने निर्णय घेतला होता की, निष्पाप लोकांना मारले जाणार नाही. आमचे ध्येय फक्त दहशतवादी अड्डे नष्ट करण्याचे होते.'

सैनिकांना सज्ज राहण्याचे निर्देश

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय सैनिकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले. लवकरच आणखी एक संधी मिळू शकते, असे संकेत देत ते म्हणाले, 'तुम्ही सर्वांनी पूर्णपणे तयार राहा. देवाच्या कृपेने तुम्हाला लवकरच आणखी एक संधी मिळेल.' 

दरम्यान, या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रभाकर सिंह(कमांडंट, बीएसएफ 140वी बटालियन), मेजर रितेश कुमार( राजपुताना रायफल्स) आणि हवलदार मोहित गैरा, अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Web Title : भारत की पाकिस्तान को चेतावनी: आतंकवाद जारी तो नक्शे से मिटा देंगे।

Web Summary : सेना प्रमुख द्विवेदी ने पाकिस्तान को आतंकवाद का समर्थन करने पर चेतावनी दी। ऑपरेशन सिंदूर 2.0 अविस्मरणीय होगा। सिंदूर 1.0 ने आतंकी शिविरों को नष्ट कर भारत की ताकत साबित की। सैनिक एक और अवसर के लिए तैयार हैं।

Web Title : India warns Pakistan: Erase from map if terror persists.

Web Summary : Army Chief Dwivedi warned Pakistan against supporting terrorism. Operation Sindoor 2.0 will be unforgettable. Sindoor 1.0 destroyed terror camps, proving India's strength. Soldiers are prepared for another opportunity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.