'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:49 IST2025-05-16T18:47:06+5:302025-05-16T18:49:43+5:30
Jagdish Devda Statement: भाजपचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यांच्या एका विधानावरून प्रचंड वाद झाला. त्यावर त्यांनी सावरासारव केली.

'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
Jagdish Devda News: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री देवडा म्हणालेले की, 'संपूर्ण देश, देशाचे लष्कर आणि जवान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.' त्यांच्या या विधानावरून वाद उफाळला. सगळीकडून टीका सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवडा यांनी सावरासारव केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या विधानावरून त्यांच्या टीका सुरू झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवडा यांनी खुलासा केला.
जगदीश देवडा यांनी काय केला खुलासा?
उपमुख्यमंत्री देवडा म्हणाले, 'जबलपूरच्या नागरी-लष्करी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमात मी जे बोललो, ते चुकीच्या पद्धतीने आणि मोड तोड करून प्रसिद्ध करण्यात येत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी माझ्या भाषणात म्हणालो होतो की, दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या धाडसी जवानांनी ऑपरेशन सिंदूर करून जो पराक्रम केला; त्याचे जितके कौतूक करावे तितके कमी आहे. संपूर्ण देश आणि देशातील जनता सैन्याच्या चरणी नतमस्तक आहे. मी सुद्धा त्यांना प्रमाण करतो.'
वाचा >>भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार
I think Madhya Pradesh has most low IQ ministers.
— Dr Nimo Yadav 2.0 (@DrNimoYadav) May 16, 2025
This BJP Minister Jagdish devda is saying “Bhartiya sainik narendra modi ke charno mein natmastak hai” with a straight face.
Good lord, somebody please give some sense to BJP leaders.pic.twitter.com/JBa1sx7mNb
जगदीश देवडा यांच्यावर टीकेचा भडीमार का?
खरंतर या वादाची सुरूवात झाली जगदीश देवडा यांच्या भाषणाच्या एका व्हिडीओ क्लिपमुळे. जबलपूरमध्ये बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, 'संपूर्ण देश, देशाचे लष्कर आणि जवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.'