शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

40 वर्षांनंतर भारत असेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 15:53 IST

सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येच्या देशांमध्ये भारतानंतर पाकिस्तानचा क्रमांक

नवी दिल्ली: पुढील 40 वर्षांनंतर भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश असेल, अशी आकडेवारी अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालातून समोर आली आहे. येत्या 40 वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या कशी वाढेल, याबद्दलचा आढावा प्यू रिसर्च सेंटरकडून घेण्यात आला आहे. 2060 मध्ये सर्वाधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्या असलेल्या देशांची यादी प्यू रिसर्च सेंटरनं प्रसिद्ध केली आहे. सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत इंडोनेशिया प्रथम क्रमांकावर आहे. 2015 च्या आकडेवारीनुसार, इंडोनेशियात 21,99,60,000 मुस्लिम धर्मीय वास्तव्यास आहेत. या यादीत सध्या भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतात 19,48,10,000 मुस्लिम धर्मीय राहतात. शेजारी पाकिस्तान याच यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या मुस्लिम धर्मीयांची संख्या 18,40,00,000 आहे. या यादीत बांग्लादेश चौथ्या आणि नायजेरिया पाचव्या स्थानी आहे. प्यू रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2060 मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश होईल. 2060 मध्ये भारतातील मुस्लिम धर्मीयांची संख्या 33,30,90,000 इतकी असेल. त्यावेळी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम धर्मीयांचं प्रमाण 19.4 टक्के होईल. तर जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 11.1 टक्के लोकसंख्या भारतात वास्तव्यास असेल. याचवेळी पाकिस्तानातील मुस्लिम धर्मीयांची संख्या 28.36 कोटींच्या घरात जाईल. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान दुसऱ्या स्थानी असेल. 2060 मध्ये पाकिस्तानातील 96.5 टक्के लोकसंख्या मुस्लिम असेल. तर जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी 9.5 टक्के मुस्लिम पाकिस्तानात वास्तव्यास असतील. 

टॅग्स :Muslimमुस्लीमIndiaभारतPakistanपाकिस्तानResearchसंशोधन