शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीने भारत नरमला? मोदी सरकारने संसदेत दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:27 IST

India US Tariff News: भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ वादावर केंद्र सरकारने संसदेत महत्वाची माहिती दिली.

India US Tariff News:भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टॅरिफ वादावर केंद्र सरकारने संसदेत महत्वाची माहिती दिली. लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद म्हणाले की, आतापर्यंत अमेरिकेने भारतावर कोणताही परस्पर शुल्क कर लादलेला नाही. भारत आणि अमेरिका एका नवीन व्यापार करारावर चर्चा करत आहेत, ज्यामध्ये दोन्ही देश आयात शुल्क कमी करण्यावर आणि पुरवठा वाढवण्यावर भर देतील. यामुळे दोन्ही देशांना याचा फायदा होईल. 

ट्रम्प सरकार 2 एप्रिलपासून शुल्क लागू करणारकेंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटले होते की, भारताने शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. ट्रम्प म्हणाले होते की, 2 एप्रिल 2025 पासून अमेरिकेपेक्षा जास्त कर आकारणाऱ्या सर्व देशांवर परस्पर शुल्क लागू केले जाईल. भारत आमच्यावर खूप उच्च शुल्क लादतो. तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाही. आमच्यावर जास्त कर लादले, तर आम्हीही कर लादणार, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

दोन्ही देशांची चांगल्या व्यापारासाठी चर्चापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांनी 2030 पर्यंत परस्पर व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय 2025 च्या अखेरीस व्यापार करारावर वाटाघाटी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. व्यापार धोरणाबाबत मंत्री जितिन प्रसाद म्हणाले की, व्यापारात आणखी सुधारणा करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सतत चर्चा सुरू आहे. भारतीय कंपन्या नवीन बाजारपेठा शोधत असून व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

2023 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात एकूण 190.08 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. भारताने 83.77 अब्ज डॉलरच्या वस्तू अमेरिकेला निर्यात केल्या, तर 40.12 अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात केली. अशा प्रकारे भारताला 43.65 अब्ज डॉलर्सचा नफा झाला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतbusinessव्यवसाय