India surpasses Russia as country third worst-hit by coronavirus | भारत जगात तिसरा! कोरोनाबाधितांच्या संख्येने रशियाला मागे टाकले

भारत जगात तिसरा! कोरोनाबाधितांच्या संख्येने रशियाला मागे टाकले

नवी दिल्ली : कोरोनामुळे रखडलेल्या अर्थचक्राला गती आणण्यासाठी लॉकडाऊन हटविल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याचाच परिणाम भारताने रुग्णसंख्येत रशियाला मागे टाकले आहे. आता भारताचा जगात तिसरा नंबर झाला आहे. 


आरोग्य मंत्रालयाच्या सकाळी 8 वाजताच्या आकड्यानुसार देशात कोरोनाचे 6,73,165 रुग्ण सापडले आहेत. तर 19286 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी 20000 हून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. मात्र, प्रति दशलक्षाच्या लोकसंख्येनुसार कोरोना संक्रमितांचा आकडा हा कमी आहे आणि बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 60.76 टक्के झाला आहे. 


आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 1,64,268 नी जादा आहे. गेल्या 24 तासांत 14,856 रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेमध्ये एकूण 2,953,014  रुग्ण सापडले आहेत. तर 1 लाख 32 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 1,578,376 लोक कोरोनाबाधित झाले असून तिथे 64,365 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा वेग कमी होण्याचे नाव घेत नाहीय. येथे एका दिवसाच 6555 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोना बाधितांचा आकडा हा 2,06,619 पोहोचला आहे. तर 8,822 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 86,049 रुग्ण उपचार घेत आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार

राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India surpasses Russia as country third worst-hit by coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.