Shocking! Abduction of manager from owner; Sprayed sanitizer in the genitals | धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले

धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत अडकल्यानंतर कंपनीने दिलेले पैसे खर्च झाल्याने त्या पैशांची मागणी करत मालकासह तिघांनी व्यवस्थापकाचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन कोंडून ठेवले़ त्यांच्या गुप्तांगावर सॅनिटायझरचा स्प्रे मारुन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़

या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी तो पौड पोलिसांकडे वर्ग केला आहे़ गणेश रामराव केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणाºया एका ३० वर्षाच्या तरुणाने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ फिर्यादीत नमूद केल्यानुसार, फिर्यादी हे कोथरुडमधील पुणे आर्ट फेस्टिवल नावाच्या कंपनीमध्ये ५ महिन्यांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते़

मार्च महिन्यात ेकार्यालयीन कामासाठी दिल्ली येथे गेले असताना लॉकडाऊन सुरु झाला व ते दिल्लीत अडकले़ त्यांच्याजवळचे पैसे संपल्याने त्यांनी  लॉजचे भाडे देण्यासाठी त्यांनी कंपनीचा लॅपटॉप तारण ठेवला़ ७ जून रोजी ते पुण्यात आल्यावर त्यांच्या मालकांनी त्यांना हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले़ पण या हॉटेलचे बिल देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी कंपनीचा मोबाईल व डेबिट कार्ड तारण ठेवले़ त्यानंतर ते १३ जून रोजी मित्रासमवेत
घोटावडे फाटा येथे थांबले असताना कंपनीच्या कारमधून मालक गणेश केंजळे, त्यांच्या चालक वैभव साबळे यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने कारमध्ये
बसवून कंपनीच्या कार्यालयात आणले़ तेथे तू कंपनीचे पैसे खर्च केले ते आताच्या आता परत दे असे म्हणून त्यांना तिघांनी मारहाण केली़ त्यांच्या
अंगावरील कपडे काढून त्यांच्या गुप्तांगावर सॅनिटायझरचा स्प्रे मारला़.


त्यानंतर त्यांना कार्यालयात बंद करुन तिघे निघून गेले़ दुसºया दिवशी कार्यालय उघडल्यावर ते नाश्ता करण्याचा बहाणा करुन तेथून पळून गेले व पोलिसांकडे धाव घेतले़ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याची सुरुवात पौड पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा पौड पोलिसांकडे वर्ग केला आहे़

अन्य महत्वाच्या बातम्या...

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार

राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

Web Title: Shocking! Abduction of manager from owner; Sprayed sanitizer in the genitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.