नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:22 IST2025-08-28T18:22:14+5:302025-08-28T18:22:29+5:30
India-Russia Relation : भारतीय अंतराळ संस्था ISRO आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉस मोठा अंतराळ कार्यक्रम राबवणार आहेत.

नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
India-Russia Relation : भारत आणि रशियामधील मैत्री आता अंतराळात एक नवा इतिहास रचण्यास सज्ज झाली आहे. भारतीय अंतराळ संस्था ISRO आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉस लवकरच एकत्रपणे मोठा अंतराळ कार्यक्रम राबवणार आहेत. या दोन संस्था एकत्र आल्यानंत अमेरिकेच्या NASA ला नक्कीच धक्का बसू शकतो.
भारताची रशियाला खुली ऑफर
भारताने रशियन कंपन्यांना देशातील नाविन्यपूर्ण अंतराळ प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि भारताच्या मोठ्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. ही माहिती रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी दिली. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त भारतीय दूतावासात आयोजित समारंभात बोलताना कुमार म्हणाले की, भारत सरकारने अंतराळ उद्योगात अनुकूल आणि सहयोगी वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक आकर्षक योजना आणि धोरणे आणली आहेत.
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
भारत आणि रशियाची दशकांपासूनची मैत्री
विनय कुमार पुढे म्हणाले, भारत आणि रशियामध्ये अंतराळ क्षेत्रात दशकांपासून खोल सहकार्य आहे. १९७५ मध्ये भारताने सोव्हिएत रशियाच्या सहकार्यानेच आपला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' प्रक्षेपित केला होता. त्यानंतर १९८४ मध्ये भारतीय वैमानिक राकेश शर्मा यांनी सोयुझ टी-११ अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला, जो त्या वेळी एक मोठी कामगिरी होती. सध्या गगनयान मानवी अंतराळ मोहिमेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवरही दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरू आहे.
इस्रो आणि रोसकॉसमॉस जगावर वर्चस्व गाजवणार
इस्रोसोबत जवळून काम करणाऱ्या रशियाच्या अंतराळ संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आणि तज्ञांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी या भागीदारीचे महत्त्व आणि भविष्यातील शक्यतांवर चर्चा केली. विनाय कुमार यांनी असेही सांगितले की, अंतराळ उद्योग हे एक आधुनिक व्यावसायिक क्षेत्र असले तरी, वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत अंतराळाशी संबंधित परंपरा आणि ज्ञान अस्तित्वात आहे. आर्यभट्ट सारख्या प्राचीन विद्वानांनी खगोलीय पिंडांच्या हालचाली आणि मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास केला. आज अंतराळ तंत्रज्ञान हे दूरसंचार, नेव्हिगेशन, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने केवळ देशाच्या तांत्रिक प्रगतीत योगदान दिले नाही, तर जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.