पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाला होता. यादरम्यान, देशातील ३२ विमानतळ बंद करण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामची घोषणा केली. यामुळे पाकिस्तान आणि भारताच्या सीमेवर सध्या शांतता आहे. कालपासून सीमेवर गोळीबार झालेला नाही.दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
युद्धविरामनंतर भारताने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे उघडले आहे, कोणत्याही अडथळ्याशिवाय विमानसेवा सुरू होईल. फक्त भारतच नाही तर पाकिस्ताननेही आपले हवाई क्षेत्र उघडले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २३ मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद केले होते.
भारतीय हवाई दलाच्या सूचनेनुसार, भारतीय हवाई क्षेत्र आता व्यावसायिक उड्डाणांसाठी पूर्णपणे खुले करण्यात आले आहे. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बंद असलेले विमानतळ उघडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ३२ विमानतळांसाठी जारी केलेले NOTAMs रद्द करण्यात आले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतरचा हा निर्णय, पूर्वी प्रतिबंधित असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये सामान्य विमान वाहतूक क्रियाकलाप पुनर्संचयित करण्याचे संकेत देत आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना फायदा होईल.
या विमानतळावरील सेवा बंद होती, आता पुन्हा सुरू झाली आहे
1. अधमपूर 2. अंबाला 3. अमृतसर 4. अवंतीपूर 5. भटिंडा 6. भुज 7. बिकानेर 8. चंदीगड 9. हलवारा 10. हिंडन 11. जैसलमेर 12. जम्मू 13. जामनगर 14. जोधपूर 15. कांडला 17. कांडला 18. किशनगड 19. कुल्लू मनाली (भुंतर) 20. लेह 21. लुधियाना 22. मुंद्रा 23. नलिया 24. पठाणकोट 25. पटियाला 26. पोरबंदर 27. राजकोट (हिरासर) 28. सरसावा 29. शिमला 30. श्रीनगर31. थोइस32. उत्तरलाई