India may witness these daily coronavirus deaths by june first week lancet | CoronaVirus: ...तर देशात जूनपर्यंत कोरोनामुळे रोज एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; लॅन्सेटनं वर्तवला धक्कादायक अंदाज 

CoronaVirus: ...तर देशात जूनपर्यंत कोरोनामुळे रोज एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; लॅन्सेटनं वर्तवला धक्कादायक अंदाज 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी तत्काळ योग्य प्रयत्न करण्यात आले नाही, तर, भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्बात लॅन्सेट कोविड-19 कमिशनकडून एका रिपोर्टमध्ये धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या रिपोर्टच्या सुरुवातीच्या समीक्षेनुसार, भारतात कोरोना व्हायरसमुळे रोज 1,750 मृत्यू होऊ शकतात. तसेच ही संख्या वाढून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 2,320 वर पोहोचू शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. (India may witness these daily coronavirus deaths by june first week lancet)

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. 'भारतातील दुसऱ्या कोविड-19 लाटेचे नियंत्रण,' असा या रिपोर्टचा मथळा आहे. 

असिम्पटोमॅटिक प्रकरण वाढवतायत महामारी -
पहिल्या लाटेच्यातुलनेत दुसरी लाट ही दोन महत्वाच्या गोष्टींनी वेगळी आहे. एक म्हणजे, कोरोना रुग्णांच्या वाढत्या ताज्या आकडेवारीचा दर फार अधिक आहे. फेब्रुवारीपासून रोज येणारे 10,000 रुग्ण वाढून एप्रिलपर्यंत 80,000 होण्यात 40 दिवसांपेक्षाही कमी कालावधी लागला. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा कालावधी 83 दिवसांचा होता. दोन म्हणजे, कोरोना व्हायरसचे रुग्ण असिम्टोमॅटिक अथवा हलके लक्षण असणारे आहेत. यामुळे, रुग्णालयात भरती होणे आणि मृत्यू दर तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. 

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

ट्रान्समिशन चेन तोडणे आवश्यक -
आर्थिक दृष्ट्या भारताला टेस्टिंगवर 7.8 बिलियन डॉलर्सहून अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. रिपोर्टनुसार, अर्थव्यवस्था आणि लोकांची रोजी-रोटी कमितकमी प्रभावित होईल या दृष्टीने, ट्रान्समिशन चेन तोडण्यासाठी आणि नावा संक्रमण दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. एवढेच नाही, तर लसीकरणाची गती वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.  

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

कठोर उपाय वेळेची आवश्यकता -
या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की 'गेल्या वर्षापासून आपल्याला धडा मिळाला आहे, की भारतात आणि इतर देशांत प्रबळ राजकीय इच्छाशक्ती चांगले परिणाम देऊ शकते. आपल्याला विश्वास आहे, की आता भारताने उचललेले ठोस पाऊल भारताला दुसऱ्या लाटेतून सावरेल, तसेच कोविड-19 संक्रमणाच्या अतिरिक्त लाटेलाही रोखेल. याशिवाय, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी, 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचेही लसिकरण करण्याचा सल्ला या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

English summary :
India may witness these daily coronavirus deaths by june first week lancet

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India may witness these daily coronavirus deaths by june first week lancet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.