CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 05:24 PM2021-04-16T17:24:10+5:302021-04-16T17:30:11+5:30

मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे  प्रशासनही भांबावले आहे. लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. (CoronaVirus)

Madhya pradesh CoronaVirus 112 dead bodies cremated in bhopal | CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

Next

भोपाळ - कोरोना व्हायरसने मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) प्रचंड थैमान घातले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असून वैद्यकीय साधनांचीही कमतरता भासू लागली आहे. राजधानी भोपाळमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. गेल्या 24 तासांत भोपाळमध्ये 1681 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 112 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र, सरकारी रेकॉर्डवर केवळ 4 जणांचाच मृत्यू झाला आहे. (Madhya Pradesh CoronaVirus 112 dead bodies cremated in bhopal)

मध्यप्रदेशात एकाच वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांवर झालेल्या अंत्यसंस्कारामुळे  प्रशासनही भांबावले आहे. लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. भोपाळमधील पॉझिटिव्हिटी रेट 29 टक्क्यांच्याही वर पोहोचला आहे. भोपाल, जबलपूर, इंदूर आणि ग्वाल्हेर येथे अंत्य संस्कारासाठी अक्षरशः वाट पाहावी लागत आहे. स्मशान भूमीवत एका पाठोपाठ एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

CoronaVirus : कुंभमेळ्यात कुणामुळे पसरला कोरोना? आता आखाडेच आले 'आमने-सामने'

एका दिवसातील मृतांची संख्या संख्या 100 पार -
भोपाळच्या सुभाष नगर विश्रामघाटावर गुरुवारी 50 मृतदेह आले. यांतील 30 मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. भदभदा विश्रामघाटावर 88 मृतदेह आले. यांतील 72 जणांवर कोरोना प्रोटेकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, झदा कब्रस्तान येथेही 17 पैकी 10 मृतदेह कोविड प्रोटोकॉल प्रमाणे दफन करण्यात आले. म्हणजेच एकूण 112 मृतदेहांवर कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

काँग्रेसचा सरकारवर आकडे लपवण्याचा आरोप - 
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाचीही झोप उडाली आहे. एवढेच नाही, तर यामुळे सरकारवही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यातच विरोधक सरकारवर सातत्याने मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप करत आहेत. काँग्रेस नेते अजय सिंह यादव यांनी सरकारवर मृतांच्या आकडेवारीत हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. हे सरकार कोरोनाच्या बाबतीत गंभीर नाही, असे अजय सिंह यांनी म्हटले आहे. तर, आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी विरोधकांच्या प्रश्नावर पलटवार करत, सरकार मृतांचा आकडा लपवत नाही. तसेच ज्या लोकांवर अंत्यसंस्कार केला जात आहे. त्यांनाही संशयित मानले जात आहे, असे सारंग यांनी म्हटले आहे. 

CoronaVirus Update: कोरोनाचा कहर! देशात 24 तासांत 217353 नवे रुग्ण, 1185 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट

24 तासांत 10 हजारहून अधिक केस -
राज्यात गुरुवारी 10,166 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर, 3,970 जणांनी कोरोनावर मात केली आहे. येथे आतापर्यंत 3.73 लाख सक्रीय रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 3.13 लाख रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
 

Web Title: Madhya pradesh CoronaVirus 112 dead bodies cremated in bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.